Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले- अजित पवारांनी विनाकारण माझे सरकार पाडले, माझ्या कार्यकाळात 70 हजार कोटींचा घोटाळा झाला नाही

Prithviraj Chavan

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Prithviraj Chavan सिंचन घोटाळा अजित पवारांची पाठ सोडत नाही, अशी मिश्किल टिप्पणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माझ्या कार्यकाळात कधीही 70 हजार कोटींचा घोटाळा झाला नाही. माझ्या कार्यकाळात सिंचन खात्याला सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश देताना 70 हजार कोटींचा घोटाळा शब्द वापरला नव्हता, असेही ते म्हणाले. अजित पवारांनी विनाकारण माझे सरकार पाडले, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.Prithviraj Chavan

अजित पवार यांनी भाजपने आरोप केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे खापर तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्यावर फोडले. त्यावेळी माझ्यावर झालेल्या आरोपाच्या चौकशीच्या फाईलवर आर. आर. आबांनी सही केली, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.



पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सिंचन घोटाळा अजित पवारांची पाठ सोडत नाही. माझ्या कार्यकाळात कधीही 70 हजार कोटींचा घोटाळा झाला नाही. मी सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन खात्याला दिला होता, तेव्हा मी माझ्या कार्यकाळात कधीही 70 हजार कोटीचा घोटाळा शब्द वापरला नव्हता. ती फाईल माझ्याकडे आली नाही. त्या फाईलवर माझी कुठलीही सही नाही. त्यामुळे सिंचन घोटाळा प्रकरणात मी चौकशी लावली नव्हती. नाहक माझा बळी घेतला. अजित पवारांनी 2014 ला माझे सरकार पाडले आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ केली, असे त्यांनी सांगितले.

…तर अँटी करप्शनकडे गेलो असतो

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, श्वेतपत्रिका म्हणजे चौकशी नाही. श्वेतपत्रिका याच्यासाठी की, अजित पवारांच्या 2010-11 आर्थिक पाहणी अहवालात 70 हजार कोटी रुपये खर्च झाले आणि सिंचनाची टक्केवारी 18.0 वरुन 18.1 झाली, हे अजित पवारांच्या नियोजन मंडळाच्या अहवालात नमूद केले होते. नव्याने मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर मी ते पाहिले असता, मला धक्का बसला. त्यामुळे नेमकी वस्तूस्थिती सांगण्यासाठी एक अहवाल सादर करण्यास सिंचन खात्याला सांगितले. पुन्हा चुका होऊ नयेत हा त्या मागचा हेतू होता. चौकशी करायची असती तर अँटी करप्शनकडे दिली असती, असे चव्हाण सांगितले.

अजित पवारांमुळे मला चौकशी बाबत कळाले

या प्रकरणाची खुली चौकशी व्हावी, असा खालून एक अहवाला आला. त्यामध्ये अँटी करप्शनकडून चौकशी करण्याचे आदेश द्यावे, असे त्या अहवालात म्हटले होते आणि तो गृहमंत्र्यांना सादर केला गेला. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्या स्तरावर ती मान्यता दिल्याचे मला आज अजित पवारांनी आज केलेल्या उल्लेखामुळे कळले, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

अजित पवार जे बोलले ते खरे आहे

ती फाईल माझ्याकडे आली नाही. त्यावर माझी सही नाही. त्यामुळे 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ‌यात मी चौकशी लावली नव्हती. माझा नाहक बळी घेतला. 2014 ला अजित पवारांनी माझे सरकार पाडले. मी अजुनही ती फाईल बघितली नाही. ती फाईल गृहमंत्र्यांच्या स्तरावरुन मान्यता मिळून खाली गेली. त्यामुळे अजित पवार जे बोलले खरे आहे. मात्र, त्यात माझा काय दोष आहे, हे सांगितले असते बरे झाले असते. मी सिंचन प्रकरण, राज्य सहकारी बँकेचे प्रकरण असेल, मी राज्याच्या जनतेच्या हिताच्या निर्णय घेतले याची मला शिक्षा भोगली, पण मला त्याची चिंता नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan said – Ajit Pawar toppled my government for no reason

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात