बारामती किंवा कराड मधले पंतप्रधान होणार नाहीत; भाजपला टोचता टोचता पृथ्वीराज चव्हाणांचे पवारांच्या जखमेवर मीठ!!

Sharad Pawar'

नाशिक : एपिस्टाईन फाईल मधून जे धक्कादायक खुलासे झाले, त्यातून मराठी माणसाला पंतप्रधान बनायची संधी आहे, असे मी म्हटले होते. पण ते 19 डिसेंबरलाच होईल, असे मी म्हटले नव्हते. शिवाय जे पंतप्रधान होतील, ते नागपूरातले असतील. बारामती किंवा कराड मधले पंतप्रधान होणार नाहीत, अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला टोचले. पण त्या पलीकडे जाऊन पृथ्वीराज बाबांनी शरद पवारांच्या जुन्या राजकीय जखमेवर मीठ चोळले.Prithviraj Chavan rubbed salt on Sharad Pawar’s old political wound

पृथ्वीराज चव्हाण गंभीर प्रवृत्तीचे नेते असून सुद्धा त्यांनी अमेरिकेतल्या एपीस्टाईन फाईलच्या मुद्द्यावर धक्कादायक भाकीत केले होते. त्या फाईल मध्ये अशी काही नावे आहेत, की ज्यामुळे भारतात पंतप्रधान बदलावा लागेल आणि नागपूर मधली मराठी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकेल, असा दावा त्यांनी केला होता. त्यांनी त्यासाठी 19 डिसेंबर ही तारीख सुद्धा दिली होती. पण त्यादिवशी पृथ्वीराज बाबांचे भाकीत काही खरे ठरले नाही. तरी देखील त्यांनी आपले मूळ भाकीत मागे घेतले नाही. एपीस्टाईन फाईलचे महत्त्व, त्यामध्ये असलेली नावे आणि त्यामध्ये असलेल्या व्यक्तींनी केलेले बाल लैंगिक शोषणाचे गुन्हे यावर त्यांनी सातत्याने भाष्य केले. अमेरिकेत त्या फाईल वरून अजूनही गोंधळ सुरू आहे. अजूनही काही कागदपत्रे उघड होत आहेत. त्यामुळे भारतात राजकीय भूकंपाची शक्यता अजूनही नाकारता येत नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.



– पंतप्रधान झाले तर नागपुरातूनच

पण त्याचवेळी त्यांनी पुढचे पंतप्रधान बारामती किंवा कराड मधून होणार नाहीत. ते नागपूर मधलेच असतील. ती नावे सगळ्यांना माहिती आहेत, असे वक्तव्य करून भाजपच्या नेत्यांना टोचले. पण त्याचवेळी त्यांनी बारामतीचे नाव घेऊन शरद पवारांच्या जुन्या जखमेवर मीठ चोळले.

– 34 वर्षे पंतप्रधानपदाच्या रेस मध्ये

शरद पवारांची तीव्र इच्छा असूनही ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. गेली 34 वर्ष ते पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये कायम राहिले, पण खऱ्या राजकीय कर्तृत्वाअभावी त्यांना ते पद मिळवता आले नाही. याची जखम त्यांच्या मनावर आणि त्यांच्या समर्थकांच्या मनावर कायम राहिली. एपिस्टाईन फाईलच्या निमित्ताने पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांच्या पंतप्रधान पदाचा मुद्दा बाहेर काढून त्यांच्या जखमेवर आणि त्यांच्या समर्थकांच्या जखमेवर मीठ चोळले.

Prithviraj Chavan rubbed salt on Sharad Pawar’s old political wound

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात