विशेष प्रतिनिधी
मुंबई :Prithviraj Chavan बिहार निवडणुकीच्या निकालांवर देशभरात चर्चा सुरू असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळ, चुकीचे अंदाज आणि अपयशी रणनीतीवर थेट बोट ठेवले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना चव्हाण यांनी पक्षाला आरसा दाखवणारे वक्तव्य केले असून, त्यांनी काँग्रेसच्या सल्लागारांच्या निर्णयक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी बिहारला गेलो नाही, पण संपूर्ण राज्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. तसेच कॉंग्रेसच्या सल्लागारांनी दिलेले अंदाज वास्तवापासून दूर होते. आपल्याकडे 19 जागा होत्या, त्या 21 किंवा 22 झाल्या असत्या, अगदी 17-18 झाले असते तरी ठीक, पण निवडक 30 जागा लढल्या असत्या आणि राजदला 40 जागा देण्याची भूमिका घ्यायला हवी होती. तसेच जागावाटपात उदारमतवादी भूमिका घेतली असती तर जास्त जागा मिळू शकल्या असत्या, असेही चव्हाण यांनी म्हटले.Prithviraj Chavan
विचारांची लढाई एक-दोन दिवसात संपत नाही
पुढे बोलताना पृथ्वीराज म्हणाले, मी काँग्रेस पक्षाबद्दल काहीतरी सांगू शकतो, तेही, जे मी थोडे पाहिले आहे. आपण काँग्रेस पक्षाचे आत्मपरीक्षण करत आहोत. जेव्हा जेव्हा विचारांची लढाई असते तेव्हा ती एक-दोन दिवसात संपत नाही. महात्मा गांधींना त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी, आंबेडकरांना त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी किती वेळ लागला हे तुम्हाला माहिती आहे. तो काळ देशाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा होता.
कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करणे गरजेचे
विचारांची लढाई खूप वेदनादायक आहे. चढ-उतार असतात. याचे मूल्यांकन करताना, मला कदाचित एकच गोष्ट वाटेल, दूरवरून, काँग्रेस पक्षाचे सल्लागार जे मतांचे आरक्षण करत होते, त्यांनी कदाचित योग्य आकडे दिले नसतील. आपण निवडक 30 जागा घेत उर्वरित 40 जागा राजदला दिल्या असत्या तर एक चांगला संदेश गेला असता आणि कदाचित जागांची संख्या काहींनी वाढली असती. आपण स्वतःचे परीक्षण केले पाहिजे, काँग्रेस काय करत आहे याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App