प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक केली आहे. दरम्यान 5 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आता कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोरटकरचे वकील आजच जामीनासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान प्रशांत कोरटकर याची पोलिस कोठडी संपल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यानंतर प्रशांत कोरटकर याच्या वकिलाने लगेचच जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. न्यायालय त्याच्या जामिनावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
दोन दिवसांपूर्वी वकील असीम सरोदे यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, प्रशांत कोरटकर खोटारडे आहेत, हे समोर आले आहे. त्याने पुरावे नष्ट केले आहेत, हे स्पष्ट होत आहे. एका सट्टा बुकीच्या तो संपर्कात आहे. त्याची माहिती समोर येणे सुद्धा आता गरजेचे आहे. कोरटकर 6 ते 7 ठिकाणी राहिला आहे. त्यामुळे त्या त्या वेळी त्याने वेगवेगळ्या गाड्या वापरल्या आहेत. त्यामुळे त्याचा तपास गरजेचा आहे त्यामुळे त्याला पोलिस कोठडीत ठेवणे गरजेचे आहे.
यापूर्वी काय घडले?
कोल्हापूर पोलिसांनी 24 मार्च रोजी प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेतल्यानंतर 25 मार्च रोजी त्याला पहिल्यांदा न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर 28 मार्च रोजी पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयाने त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App