विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्रातल्या महिला अत्याचारांपासून कायदा सुव्यवस्था मुद्द्यापर्यंत सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारला ठोकले, पण अप्रत्यक्षपणे पवारांच्या मनातल्या महिला मुख्यमंत्र्याला त्यांनी बाजूला सारून दिले. Praniti Shinde target mahayuti
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध घडामोडींवर भाष्य करून महायुती सरकारला घेरले. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची गंभीर आहे.
Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
महिला येथे सुरक्षित नाहीत, तर महिला मुख्यमंत्री असा सवालच फार दूर आहे, असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केले. या वक्तव्यातून त्यांनी महायुती सरकारला ठोकलेच, पण शरद पवार आणि त्यांचा गोतावळा महाराष्ट्रामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या रूपाने पहिली महिला मुख्यमंत्री करायच्या नादाला लागल्याच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या मनातल्या महिला मुख्यमंत्र्यालाच बाजूला सारून दिले.
गुजरात मध्ये स्वातंत्र्यदिनी बलात्कार करणाऱ्यांचा धार्मिक आधारावर सत्कार केला जातो, ही भाजपच्या राज्यकर्त्यांची विकृत मानसिकता आहे. आम्ही काहीही करू शकतो, ही त्यांची मग्रुरी तयार झाली आहे. या राज्यकर्त्यांच्या राज्यांमध्ये आधी महिला सुरक्षित ठेवा, नंतर पुढचं पाहू. महिला मुख्यमंत्री ही तर फार पुढची चर्चा आहे, असा टोला प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारला हाणला, पण प्रत्यक्षात पवारांच्या मनातल्याच महिला मुख्यमंत्र्याला त्यांनी चतुराईने बाजूला सारून दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more