विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prakash Mahajan मुंबई विमानतळ बंद करण्यात येऊन ती जागा हडपण्याचा डाव असल्याची शंका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केली होती. राज ठाकरेंनी केलेल्या या आरोपावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पलटवार केला आहे. मुंबईतील सांताक्रुज विमानतळ बंद झाले, ते काय विकले का सरकारने? असा सवाल महाजन यांनी राज ठाकरेंना उद्देशून विचारला आहे.Prakash Mahajan
प्रकाश महाजन म्हणाले, राज ठाकरे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून सांगतो, तुमच्या डोक्यावर कोणी नाही म्हणून तुम्ही असे बेलगाम झाले आहात. मग तुम्ही कशाला अमित शहा, सोनिया गांधी यांना भेटायला गेले होते. मुख्यमंत्री या पदाचा मान ठेवा, प्रत्येक पक्ष चालवण्यासाठी एक पद्धत असते, असा पलटवार महाजन यांनी केला आहे.Prakash Mahajan
पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, मुंबईतील सांताक्रुज एअरपोर्ट बंद झाले, ते काय विकले का सरकारने? कदाचित यांचे व्यवसाय बिल्डर असल्यामुळे त्यांचा डोळा त्या जागेवर असेल. सुगीत संधी की संधीत सुगी ते शोधत आहेत, हे माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. बाळासाहेबच ब्रॅंड होते, त्यांच्या पुढची पिढी बोलताना ब्लॅंक होते, भविष्यात एक बोलेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि दूसरा बोलेल राज ठाकरे मुख्यमंत्री होतील, काही सांगता येत नाही.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावर देखील प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे राजकीय विधान आहे, असा माझा अनुभव आहे. कोणत्याही ठाकरेला त्यांची चूक दाखवलेली अजिबात आवडत नाही. त्यांना सल्ला दिलेला देखील आवडत नाही. उद्धव ठाकरेंचे हे राजकीय विधान आहे. स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी हे एक चावट विधान आहे.
दोन्ही भावांमध्ये वितुष्ट आणणारा संजय राऊतच
प्रकाश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, जे उद्धवला बोलता येत नाही ते याच्या तोंडात टाकून दिले जाते. आता दोन्ही भावाचा संजय राऊत प्रवक्ता झाला आहे. शिवसेनेच्या वचनाला 2019 मध्ये तडा याचमुळे गेला. दोन्ही भावांमध्ये वितुष्ट आणणारा हाच आहे. आता दोन्ही भावांना बोहल्यावर उभा करणारा हाच भटजी आहे. याच्या मनात सुप्त राग आहे. याच्या भावाला आणि याला कधीच केंद्रात आणि राज्यात मंत्री केले नाही, त्याचा राग याच्या मनात आहे आणि तो राग अशा पद्धतीने सगळ्यांचे कसे वाटोळे होईल हे पाहून संजय राऊत करतो आहे, अशी खरमरीत टीका महाजन यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App