Prakash Mahajan : राज ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, सत्तेसाठी कोणत्या थराला चालले, हिंदुत्व कुठे आहे? प्रकाश महाजनांची टीका

Prakash Mahajan

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Prakash Mahajan  मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, ‘दै. सामना’साठी दिलेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीतून शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात गेलेले नेते प्रकाश महाजन यांनी थेट राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. Prakash Mahajan

राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, सत्तेसाठी चावडी केली. सत्तेसाठी कोणत्या थराला चालले आहेत, हिंदुत्व कुठे आहे? चंदू मामा कुठे आणि रशीद मामूला त्यांनी जवळ केले, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. Prakash Mahajan



पुढे बोलताना प्रकाश महाजन यांनी संजय राऊत तसेच अभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्यात तीन वर्षांपूर्वी एक मुलाखत झाली, त्याचा हा सिक्वल आहे. त्या मुलाखतीत राज ठाकरे सहज नव्हते, चित्रपट सृष्टीतील कोणी नसेल तर एका संपादकाला मुलाखत दिली, असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली. तसेच महेश मांजरेकर यांना कशाची भीती? त्यांचे मित्र अन्डरवर्ल्डचे आहेत, असा टोला महाजन यांनी लगावला आहे.

मराठीसाठी यांनी काय केले?

मराठी माणूस हा त्यांच्या प्रचाराचा मुखवटा आहे, त्यांना मराठी माणसाची काळजी आहे म्हणून ते सोबत नाहीत. तीन वर्षापूर्वीच्या मिळकतीत काही बदल झाला नाही, त्यांची सत्ता येणार नाही हे 100 टक्के आहे. मुंबईत सत्ता महायुतीची येणार आहे. मराठीसाठी यांनी काय केले? असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. तसेच राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्यासोबत जाऊन आनाडी नाहीत. आज मनसेतून लोक बाहेर पडत आहेत, पण मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी हे चालले आहे, असेही महाजन यांनी म्हटले.

राज ठाकरेंभोवती ठरावीक वर्तुळ

संतोष धुरींनी मनसे सोडून भाजपात प्रवेश केला. यावर प्रकाश महाजन म्हणाले, राज ठाकरेंभोवती ठरावीक वर्तुळ आहे. संदीप देशपांडेही आनंदी नाही, धुरी यांनी संदीपला विचारल्याशिवाय ते बाहेर पडले नसतील. पन्नास खोके मला माहीत नाही. पण, एकनाथ शिंदे यांना एक खोके दिले आहे हे माहीत आहे. तुमचा विषय पैशाचा आहे. तुम्ही आरोप कोणावर करता. एकजण गुजरातला जातो, त्याच्या मागे जातीधर्माचे नाही तरीही पन्नास लोक बाहेर जातात, असे म्हणत एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचेही महाजन यांनी समर्थन केले.

उद्या सत्ता आली तर दोघांच्या बायकोत भांडण लागेल

पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात काय लिहिले आहे, राज ठाकरे यांचे पांचट वक्तव्य आहे. मराठवाड्यात शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केलेच नाही. उद्या सत्ता आली तर दोघांच्या बायकोत भांडण लागेल. तुम्ही चावडीवर आले, तुमचे सूप काढले.

ठाकरे बंधूंना उद्देशून बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, मराठी हे बुजगावणे उभे केले आहे. हे मुंबईत कुठे जन्मले? ते एसीत जन्मले आहेत. निवडणुकीत यश मिळावे म्हणून मराठीचा मुद्दा काढला. कोहिनूर मिलमध्ये मराठी माणसाला काम देऊ म्हणाले, पण मायकल जॅकसनचा कार्यक्रम घेतला त्याचा हिशोब देत नाहीत, असेही महाजन म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात