प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा, भुजबळांसह अनेक दिग्गज नेत्यांना केले आमंत्रित

Prakash Ambedkar's Reservation Rescue Yatra, invited many eminent leaders including Bhujbal

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन वाद वाढत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून हे दोन्ही समाज आमनेसामने आले आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. त्यांची यात्रा उद्या म्हणजेच 25 जुलैपासून सुरू होत आहे. या यात्रेला मुंबईतील चैत्यभूमीवरून सुरूवात होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी दिग्गज नेत्यांना आमंत्रीत केले आहे. भुजबळांना पाठवलेल्या पत्रात आंबेडकरांनी त्यांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. Prakash Ambedkar’s Reservation Rescue Yatra, invited many eminent leaders including Bhujbal

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा महत्त्वाची मानली जात आहे. यासाठी आंबेडकरांनी शरद पवार यांनाही पत्र लिहिले आहे. मात्र, शरद पवारांनी या संदर्भात अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. या यात्रेत शरद पवार सहभागी झाले, तर मराठा समाज नाराज होण्याची शक्यता आहे. तर सहभागी झाले नाही तर ओबीसी समाज नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पवार कोंडीत सापडले आहेत.

कसा असेल प्रकाश आंबेडकर यांच्या यात्रेचा मार्ग?

ओबीसी आरक्षण बचाव यात्रा 25 जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांनाही निमंत्रित केले आहे. त्यामुळे या यात्रेत कोण-कोणते नेते सहभागी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Prakash Ambedkar’s Reservation Rescue Yatra, invited many eminent leaders including Bhujbal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात