दोन लोक भेटल्याच्या मुद्द्यावर किती खोटं बोलावं यालाही मर्यादा असते; प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दोन लोक भेटल्याच्या मुद्द्यावर किती खोटं बोलावं यालाही मर्यादा असते, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना टोला हाणला. निवडणूक प्रक्रिया 2004 पासून मॅन्युप्युलेट होते आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. Prakash Ambedkar

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले :

शरद पवारांना दिल्लीत दोन लोक भेटले. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली आणि त्यांची राहुल गांधींशी भेट घडवून आणली. पण शरद पवारांना त्या दोघांची नावे आठवत नाहीत. Prakash Ambedkar



किती खोटं बोलावं, यालाही एक मर्यादा असते. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या भेटीला कोण येतं-जातं याची नोंद नेहमी घेतली जाते. ज्या दिवशी शरद पवार भेटायला गेले, त्या दिवसाचं रजिस्टर पाहिलं तर त्यांच्या सोबत गेलेले दोन लोक कोण होते हे सहज समजू शकतं.

सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता, पण राजकीय कार्यकर्त्यांना फसवणं शक्य नाही. 2004 पासून निवडणुका मॅन्युप्युलेट होत आहेत, हे मी तेव्हापासूनच म्हणतोय, पण तेव्हा कुणी लक्ष दिले नव्हते. आता काही लोकांच्या लक्षात येतंय एवढेच त्या ठिकाणी म्हणता येईल.

Prakash Ambedkar’s attack on Sharad Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात