विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीवर मात केल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळण्याची अपेक्षा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना निर्माण झाली. त्यातूनच त्यांच्यात सत्तेचा वाटा जास्तीत जास्त खेचायची स्पर्धा सुरू झाली. यासाठीच जागावाटपात आपला वरचष्मा हवा, याची स्पर्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात लागली. या स्पर्धेचा पंचनामा प्रकाश आंबेडकरांनी सांगलीतल्या पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडीत मोठा गृह कलह सुरू आहे. काँग्रेस आणि शरद पवार दोघे मिळून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकावर ढकलत असल्याचा दावा आंबेडकरांनी केला. Prakash ambedkar told the story of MVA breaking
प्रकाश आंबेडकर म्हणाले :
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 150 जागा हव्या आहेत तर, 88 जागांच्या खाली यायचं नाही असं शरद पवारांनी ठरवलं आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 44 जागा सोडायला ते तयार आहेत. या फॉर्म्युल्यामुळे बरंच राजकारण होईल, असं मला ओबीसींचे नेते सांगत आहेत. आपल्या जागा टिकवून ठेवण्याचा सर्वांत मोठा पेच हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर राहणार आहे.
Rhea Barde : द फोकस एक्सप्लेनर : बन्ना शेख कशी झाली रिया बर्डे? भारतात अश्लील चित्रपट बनवले… अटकेतील बांगलादेशी पॉर्न स्टारची संपूर्ण कहाणी
एका सर्व्हेनुसार, उद्धव ठाकरेंकडे जे 5.7 % मतदान होतं, त्यापैकी 2.7 % मतदान लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंकडे वळले आहे, असे काँग्रेसमधील लोकांचं मत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना अधिक जागा देणं हे परवडणारं नाही. यावरूनच महाविकास आघाडीत बराच गृहकलह माजला आहे. Prakash Ambedkar
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आणि मागणीला शरद पवारांनी पाठिंबा दिल्यानंतर ते फक्त मराठा समाजाचे नेते उरले आहेत. शरद पवार आधी सार्वत्रिक म्हणजे सगळ्या समाजाचे नेते म्हणून गणले जात होते, पण आता ते फक्त मराठा समाजाचेच नेते उरले आहेत, असे ओबीसी नेते त्यांच्या मेळाव्यांमध्ये सांगतात. त्याच्यावर पवारांच्या स्वतःच्या कृतीने शिक्कामोर्तब झाले आहे. Prakash Ambedkar
संजय राऊतांचा प्रतिवाद
प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आमच्यात काहीही भांडणं नाही. प्रकाश आंबेडकरांनी जर लोकसभेचे निकाल पाहिले असतील तर आमची वज्रमुठ मजबूत होती. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो. प्रकाश आंबेडकर जर आमच्यासोबत असते तर ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि भाजप 100 % नेस्तनाबूत झाला असता, असे ते म्हणाले. Prakash Ambedkar
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App