विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prakash Ambedkar महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रचाराचा शुभारंभ केला आहे. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आंबेडकरांची आज सभा पार पडली. या सभेत बोलताना कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. इतके दिवस तुम्ही शरद पवारांच्या नादी लागलात, म्हणजे दाऊद इब्राहीमच्या नादी लागलात. म्हणून तुमची अशी अवस्था झाली, असे म्हणत आंबेडकरांनी टीका केली आहे.Prakash Ambedkar
सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, कॉंग्रेसकडे आता मतदार उरला नाही. केवळ मुस्लिम मतदार त्यांच्याकडे राहिला आहे. तुम्ही इतके दिवस शरद पवारांच्या नादी लागलात म्हणजे दाऊद इब्राहीमच्या नादी लागलात. म्हणून तुमची अशी अवस्था झाली आहे. बाबाजाणी यांनी खतीब यांचा उपयोग करून घेतला आणि आता ते कॉंग्रेसचीच वाट लावायला निघालेत, अशी टीका त्यांनी कॉंग्रेसचे बाबाजाणी दुर्राणी यांच्यावर केली आहे.Prakash Ambedkar
शरद पवार म्हणजे दाऊद इब्राहीमच
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, इथल्या मुस्लिमांना आवाहन आहे, काँग्रेसकडे आता काही राहिले नाही, फक्त मुस्लिम मतदार उरला आहे. काँग्रेस शरद पवारांच्या नादी लागल्याने असे झाले आहे. शरद पवार म्हणजे दाऊद इब्राहीमच आहेत. आता काँग्रेसकडे मतदार नाही, तेव्हा उद्याच्या व्यवस्थेमध्ये संविधान टिकले पाहिजे असे वाटत असेल तर मुस्लिमांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे.
हुकुमशाहीला सुरुवात झाली
परभणी येथील सभा पार पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना बिनविरोध नगरसेवक निवडून येत असल्याच्या प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. यावर आंबेडकर म्हणाले, हुकुमशाहीला सुरुवात झाली आहे. आमदारांनी उमेदवारांना दमदाटी करून पळवले आहे. काही ठिकाणी विकत घेतले आहेत. अर्ज माघारी घेण्याची सिस्टिम आता बंद केली पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत. तरच लोकशाही टिकेल असे आम्ही मानतो.
भाजपला येथील राजकीय पक्ष संपवायचे आहेत
महायुतीतील पक्ष काही ठिकाणी वेगळे लढत आहेत, यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपला येथील राजकीय पक्ष संपवायचे आहेत. इलेक्शन निमित्ताने आपल्याला यांना संपवता येईल असे त्यांना वाटत आहे. म्हणून त्यांनी युती केली नाही. सत्ता आली नाही की पक्ष संपतात अशी परिस्थिती आहे. सगळीकडे अजित पवार युतीतून वेगळे लढत आहेत. मुस्लिमांचे विभाजन करण्याचे ते बघत असल्याचे मत आंबेडकरांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App