विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात आपली राजकीय इभ्रत वाचवण्यासाठी काँग्रेसने आता प्रकाश आंबेडकरांचे लांगुलचाचलन सुरू केले असून त्यांना राज्यसभेबरोबरच केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर देऊन टाकली आहे. आता या सगळ्या ऑफर देवाण-घेवाणीत केंद्रात आपली सत्ता खरंच येणार की नाही??, याविषयी मात्र काँग्रेसजन खात्रीने बोलायला तयार नाहीत. prakash ambedkar Offered Union Minister post along with Rajya Sabha
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवून निवडून येण्याची क्षमता नसली तरी इतरांचे उमेदवार पाडण्याची त्यांची भरपूर क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या बाजूने उभे राहावे निदान महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये वंचितचा उमेदवार देऊ नये, यासाठी काँग्रेसचे नेते धडपड करत आहेत. त्यातूनच ते प्रकाश आंबेडकरांना वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. राज्यसभेची खासदारकी आणि केंद्रीय मंत्रीपद हा त्याच ऑफर्स मधला एक भाग आहे.
प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीशी काडीमोड; जरांगे + ओबीसी आघाडीशी जुळविले सूत!! वंचितचे 8 उमेदवार जाहीर
दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढे करायला तयार असून, तुम्हाला जागा पाहिजेत तर त्या जागा पण द्यायला तयार असल्याचे म्हटले होते. आता काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना नवीन ऑफर दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत समझोता करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे. काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवायला आणि केंद्रात मंत्रिपद द्यायला देखील तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिस अहमद यांनी दिली आहे.
आंबेडकरांमुळे बीजेपीला फायदा होईल…
2019 मध्ये ही प्रकाश आंबेडकर यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. या वेळेलाही प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकत नाही. मात्र, त्यांच्यामुळे भाजपला फायदा होईल असे आम्ही त्यांना कळविले आहे. प्रकाश आंबेडकर आमचे मोठे भाऊ असून, ते राज्यसभेत पाठवण्या संदर्भातल्या आमच्या प्रस्तावाला मान्यता देतील, अशी अपेक्षा असल्याचेही अनिस अहमद म्हणाले.
आंबेडकरांची मनधरणी
महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच बाहेर पडण्याचा देखील निर्णय घेतला. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधींना मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला होता. अनेक बैठकींना आमंत्रण मिळत नव्हते आणि अपेक्षित जागा देखील दिल्या जात नसल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या एकला चलो रे भूमिकेचा सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत होणारे हे नुकसान पाहता काँग्रेसचे नेते आंबेडकरांची मनधरणी करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App