विशेष प्रतिनिधी
अकोला : prakash ambedkar वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी राज्यातील ओबीसी नेत्यांच्या धरसोड वृत्तीचा समाचार घेतला आहे. कोणतेही आंदोलन यशस्वी होण्यासाठी त्यात प्रामाणिकता असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर माझी भूमिका धरसोड वृत्तीची आहे का? हा प्रश्न ओबीसीच्या सर्वच नेत्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, असे ते म्हणालेत.prakash ambedkar
सकल ओबीसी समाजाच्यावतीने अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ओबीसी आरक्षण बचावा’साठी आमरण उपोषण सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांनी शुक्रवारी सकाळी उपोषणस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी ओबीसी नेत्यांना व घटकांना वरील सल्ला दिला. ते म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाच्या ताटात वाटेकरी नको ही भूमिका आमची सुरुवातीपासून आहे. गरीब मराठा समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. पण कोणतेही आंदोलन यशस्वी व्हायचे असेल, तर त्यात प्रामाणिकता ही महत्त्वाची आहे. प्रामाणिकता नसेल तर आंदोलन यशस्वी होत नाही.prakash ambedkar
कोणतेही आंदोलन यशस्वी व्हायचे असेल, तर त्यात प्रामाणिकता ही महत्त्वाची आहे. प्रामाणिकता नसेल तर आंदोलन यशस्वी होत नाही. ओबीसी समूहातील सर्व घटकाने स्वत:हून स्वतःला विचारले पाहीजे की, ओबीसी आरक्षण प्रश्नी माझी धरसोड वृत्ती आहे का? तसं असेल तर आपला प्रश्न कसा सुटेल? ओबीसी हा… pic.twitter.com/eapTMaqesy — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 19, 2025
कोणतेही आंदोलन यशस्वी व्हायचे असेल, तर त्यात प्रामाणिकता ही महत्त्वाची आहे. प्रामाणिकता नसेल तर आंदोलन यशस्वी होत नाही.
ओबीसी समूहातील सर्व घटकाने स्वत:हून स्वतःला विचारले पाहीजे की, ओबीसी आरक्षण प्रश्नी माझी धरसोड वृत्ती आहे का? तसं असेल तर आपला प्रश्न कसा सुटेल? ओबीसी हा… pic.twitter.com/eapTMaqesy
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 19, 2025
ओबीसी नेत्यांना स्वतःला प्रश्न विचारण्याचा सल्ला
ओबीसी समूहातील सर्व घटकांनी स्वत:हून स्वतःला विचारले पाहीजे की, ओबीसी आरक्षण प्रश्नी माझी धरसोड वृत्ती आहे का? तसे असेल तर आपला प्रश्न कसा सुटेल? ओबीसी हा वेगळा घटक आहे. त्याचे प्रश्न आहेत, अडचणी आहेत, या गोष्टींची जाणीव झाली पाहीजे. ओबीसीच्या सर्व नेत्यांनी हे तपासले पाहिजे की, आपण ज्या पक्षात आहोत, त्या पक्षांची भूमिका काय आहे? त्या पक्षाची भूमिका ओबीसी आरक्षण विरोधात असेत, तर तो प्रश्न सुटणार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ओबीसी नेते ज्या पक्षात काम करतात त्या पक्षाची भूमिका विरोधात असेल, तर आपण कितीही लढलो, कितीही उपोषणे केली, तरी हा प्रश्न धसास लागणार नाही. आरक्षणाचा लढा केवळ ओबीसी समाजाच्या हिताताच नाही तर समाजात न्याय व समानता कायम राखण्यासाठीही आवश्यक आहे. पण लोकशाही प्रक्रियेच्या माध्यमातूनच अधिकारांचे संरक्षण होऊ शकते हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही आंबेडकरांनी यावेळी ठणकावून सांगितले.
भुजबळ, हाके मराठा आरक्षणावर आक्रमक
उल्लेखनीय बाब म्हणजे महायुती सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्याचा जीआर काढला आहे. या जीआरवरून राज्यात मोठे रणकंदन माजले आहे. विशेषतः ओबीसी नेते छगन भुजबळ व लक्ष्मण हाके यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप या दोघांनी केला आहे.
या प्रकरणी छगन भुजबळ म्हणाले होते की, ओबीसी – मराठा समाजातील संघर्ष शांत झाला पाहिजे असे मलाही वाटते. परंतु आज काही लोकांच्या (मनोज जरांगे) दादागिरीमुळे मराठा नेतेही बोलण्यास तयार नाहीत. त्यांचा दबाव त्यांच्यावर आहे. राज्यात मराठा नेते व मराठा मंत्री किती आहेत. शिक्षण क्षेत्रात अभ्यासक किती आहेत. लेखकही खूप आहेत. पण ते आज बोलू शकत नाहीत. कदाचित त्यांच्या मनातही याविषयी काहीतरी भीती असावी.
मराठा समाज ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेणार, मराठा आरक्षणातून घेणार, कुणबीमधूनही घेणार, मग बाकीच्यांनी कुठे जायचे? हा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही हे सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळेच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण नाकारले. हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे हे कोर्टाने मान्य केले आहे. त्यामुळे काही अभ्यासू लोक असतील तर त्यांनी त्यावर विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App