विशेष प्रतिनिधी
नागपूर : Praful Patel राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल मोठा खुलासा केला आहे. आमची भाजपसोबत जाण्याची इच्छा खूप आधीपासून होती, इतकेच नाही तर शरद पवार यांची देखील तीच इच्छा होती. 2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा आणि भाजपने शिवसेनेचा हात सोडायचे ठरले होते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.Praful Patel
गोंदियात महायुतीच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले, भाजपासोबत येण्याची खूप आधीपासून आमची आणि मोठ्या साहेबांची (शरद पवार) देखील इच्छा होती. मात्र, गाडी स्लीप होऊन जात होती. 2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचा आणि भाजपवाल्यांनी शिवसेनेचा हात सोडायचा असे ठरले होते.Praful Patel
पुढे ते म्हणाले, 2014 च्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी स्वतः बाहेरुन पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती. आमच्या सहकार्याने हरिभाऊ बागडे स्पीकर म्हणून निवडून आले . मात्र, पुन्हा गडबड झाली आणि आम्ही मागे राहून गेलो तुम्ही पुढे निघून गेले. असे म्हणत पटेल यांनी मंचावर बसलेल्या भाजप आमदारांनाही हलकासा टोला लगावला.
आगामी निवडणुकीत युतीचा विचार डोक्यातून काढून टाका
दरम्यान, भंडारा येथे एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबतही थेट सूचना दिल्या. “जिथे आपली ताकद आहे, तिथे आपलाच उमेदवार निवडणूक लढेल या विचाराने कामाला लागा,” असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. तसेच, “युतीचा विचार डोक्यातून काढून टाका,” असेही त्यांनी म्हटले.
जिथे पक्षाचे सक्षम उमेदवार आहेत, तिथे त्यांना संधी दिलीच पाहिजे, असे सांगताना त्यांनी जुन्या जागांवर दुसऱ्याचा उमेदवार आला असेल तरीही आता आपली ताकद असेल तर आपण लढले पाहिजे, असे कार्यकर्त्यांना सांगितले. पटेल यांच्या या भूमिकेने आगामी काळात स्थानिक राजकारणात महायुतीमधील जागावाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्धव-राज आल्यावर फरक पडणार नाही
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना पटेल म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे असताना ते दोघेही शिवसेनेत एकत्र होते. वेगळे झाल्यानंतर आता पुन्हा एकत्र आले, तरी त्यात काही वेगळं नाही. त्यामुळे त्याचा फारसा फरक पडणार नाही.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App