प्रतिनिधी
नाशिक : शरदनिष्ठ राष्ट्रवादी विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादी यांच्यात या संघर्षात शरद पवारांनी अजितदादांच्या बारामती मतदारसंघात नाही, तर छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात पहिली सभा घेतली. भुजबळांना 20 वर्षांपूर्वी येवल्यातून उमेदवारी दिल्याबद्दल माफी मागितली. भुजबळांनी शरद पवारांनी केलेले आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीतले सगळे वाद विवाद उलगडून सांगितले.Praful Patel’s refusal to work under Supriya Sule.
प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या नंतरचे दोन नंबरचे नेते होते. पण सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष केल्यानंतर त्यांच्या हाताखाली काम करायला प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिला होता. मी उपाध्यक्ष असताना सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष होणार असतील, तर मी दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर का जाऊ?? मी राजीनामा देतो, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. शेवटी मी त्यांची समजूत काढली आणि सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल दोघेही कार्याध्यक्ष होतील आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव दुसऱ्याच क्रमांकावर राहील, असे सुनिश्चित केले याची आठवण छगन भुजबळ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत करून दिली.
प्रफुल्ल पटेल यांनी देखील दोनच दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीतल्या फुटीतले कारण सुप्रिया सुळे यांचे प्रमोशन हेच होते, हे स्पष्ट केले होते. छगन भुजबळांच्या आजच्या वक्तव्यातून प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यालाच दुजोरा मिळाला आहे.
शरद पवार यांनी नाशिकच्या येवल्यामध्ये काल जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या आरोपांना उत्तर दिले. त्यांनी राष्ट्रवादीतली इनसाईड स्टोरी सांगितली. प्रफुल्ल पटेल राजीनामा देणार होते, पण त्यांना आपण रोखल्याचे भुजबळांनी सांगितले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा नेमक्या काय घडामोडी घडल्या. त्याबाबतही भुजबळांनी मोठे खुलासे केले आहेत.
शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा मला याबाबतची काहीही कल्पना नव्हती. तेव्हा मी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा त्यांनी ऐकले नाही. पण पुढे काहीच दिवसात त्यांनी राजीनामा मागे घेतला, असं भुजबळ म्हणाले.
सुप्रिया सुळे यांना कार्यध्यक्ष करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला. तेव्हा आम्हा सगळ्या नेत्यांना तो निर्णय कळविण्यात आला. तेव्हा प्रफुल्ल पटेल नाराज झाले. ते म्हणाले मी राजीनामा देतो. दुसऱ्या क्रमांकांच्या पदावरून तिसऱ्या क्रमांकाचे पद मी घेणार नाही, असे म्हणाले. पण मी त्यांना समजावले. तुम्ही आणि सुप्रिया दोघं कार्यध्यक्ष व्हा. दुसऱ्या क्रमांकावर तुम्हीच राहा, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना काही प्रश्नही विचारले आहेत. सगळे लोक जर पवार साहेबांवर एवढं प्रेम करतात, तर मग नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार का पडतात??, असा सवाल भुजबळांनी केला आहे.
2019 मध्ये अजित पवार यांच्या समोर सगळं घडलं. पण शरद पवार यांनी घुमजाव केल्याने अजित पवार सकाळी शपथ घेतली. मीच त्यावेळी आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले होते, असा खुलासाही छगन भुजबळ यांनी केला आहे.
माझ्यावरच राग का??, असा प्रश्न भुजबळांनी शरद पवार यांना केला आहे. येवल्याचे लोक सांगतात की, तुम्ही माफी मागण्यासारखे मी काही केलेले नाही, असं ते म्हणाले.
भाजपने फुले – शाहू – आंबेडकर यांचा अपमान केला म्हणता. मग तुम्ही त्यांच्यासोबत का गेला?? ज्यांनी अपमान केला, ते रिटायर झाले. शिंदे – फडणवीस यांना सांगितल्यानंतर एक महिन्याच्या आत महात्मा फुले यांच्या प्रतिमा उभ्या राहिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीत तुषार मेहता यांना भेटले आणि आमचे ओबीसी आरक्षण आले, असे वक्तव्यही छगन भुजबळ यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more