विशेष प्रतिनिधी
जळगाव : Eknath Khadse राज्यात सध्या गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रफुल लोढाकडे काही महत्त्वाचे पुरावे असल्यानेच त्याला विविध गुन्ह्यांमध्ये अडकवून जाणीवपूर्वक ताब्यात ठेवण्यात आले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.Eknath Khadse
खडसे म्हणाले, “प्रफुल लोढाकडे काही अशा प्रकारची माहिती किंवा पुरावे असण्याची शक्यता आहे, जे सत्ताधाऱ्यांना धक्का देणारे असू शकतात. त्यामुळेच त्या पुराव्यांचा प्रसार होऊ नये आणि ते इतर कोणाकडे जाऊ नयेत, म्हणून त्याला गुन्ह्यांत गुंतवून अटक करण्यात आली आहे.”Eknath Khadse
दरम्यान, गिरीश महाजन यांनी एका पत्रकार परिषदेत “खडसेंचा राग येत नाही, पण त्यांची कीव येते,” अशा शब्दांत टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना खडसे यांनी जोरदार पलटवार केला. “माझ्यावर आतापर्यंत पाच वेळा चौकशी करण्यात आली. गिरीश महाजन यांच्यात जर खरंच हिंमत असेल, तर त्यांनी त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी स्वतः करावी,” असे आव्हान त्यांनी दिले.
खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला की, “एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या मुलाकडे एवढी संपत्ती कुठून आली? महाजन यांचा व्यवसाय तरी नेमका आहे तरी काय? त्यांनी जनतेला हे स्पष्टपणे सांगावे.”
तसेच, गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्येची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना खडसे म्हणाले, “माझ्या मुलाच्या आत्महत्येबाबत काय चौकशी करायची असेल ती त्यांनी जरूर करावी. मला पुत्रशोक आहे आणि मी त्यातुन सावरतो आहे, पण गिरीश महाजन यांना मूल नसल्यामुळे असा शोक काय असतो हे त्यांना समजणार नाही,” असा भावनिक प्रत्युत्तर त्यांनी दिले.
या संपूर्ण प्रकरणामुळे हनी ट्रॅप कांडाची व्याप्ती आणखी वाढली असून, केवळ व्यक्तिगत चौकशीपुरती ही बाब मर्यादित नसून ती सत्तेतील संभाव्य दडपशाही, माहिती दडवण्याचा प्रयत्न आणि विरोधकांना त्रास देण्याच्या राजकीय नीतीचा भाग असल्याची शक्यता एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App