विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लसीकरणातही महाराष्ट्रातले काँग्रेस नेते आणि ठाकरे – पवार सरकारमधले ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना “मनूवाद” दिसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादात ११ ते १४ एप्रिल कोरोना प्रतिबंधक लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. power minister nitin raut sees manoovad in corana vaccination utsav proposed by PM narendra modi
या आवाहनावर नितीन राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, आधी मेणबत्ती, थाळी आणि आता उत्सव कसले साजरे करता? फुले, आंबेडकर हे मनूवादाविरोधात होते. त्यांचे नाव कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला देणे चुकीचे आहे. गोळवलकर गुरूजी हे भाजपचे आद्य दैवत आहे. फुले – आंबेडकर नाहीत, अशी टीकाही राऊत यांनी भाजपवर केली.
मोफत विजेवरून राज्य मंत्र्यांनी उडविली नितीन राऊतांची खिल्ली
महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा उत्सव साजरा करणार नाही, तर अभियान राबविणार असल्याचे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.
हमारा प्रयास यही होना चाहिए कि इस टीका उत्सव में हम ज्यादा से ज्यादा लोगों को वैक्सीनेट करें। मैं देश के युवाओं से भी आग्रह करूंगा कि आप अपने आसपास जो भी व्यक्ति 45 साल के ऊपर के हैं, उन्हें वैक्सीन लगवाने में हर संभव मदद करें: PM @narendramodi — PMO India (@PMOIndia) April 8, 2021
हमारा प्रयास यही होना चाहिए कि इस टीका उत्सव में हम ज्यादा से ज्यादा लोगों को वैक्सीनेट करें।
मैं देश के युवाओं से भी आग्रह करूंगा कि आप अपने आसपास जो भी व्यक्ति 45 साल के ऊपर के हैं, उन्हें वैक्सीन लगवाने में हर संभव मदद करें: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 8, 2021
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोना लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला.
पण महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्र्यांना मात्र यामध्ये तथाकथित मनूवाद दिसल्याचे त्यांनी केलेल्या टीकेवरून स्पष्ट होत आहे. शिवाय त्यांनी गेल्यावर्षीच्या थाळी वादनाचा आणि दीप प्रज्ज्वलनाचा उल्लेख करून भाजपवर निशाणा साधण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र, या दोन्ही उपक्रमांना जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची वस्तुस्थिती आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App