विशेष प्रतिनिधी
मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केट २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा , तिचं शहर होणं , पांडीचेरी , राख आणि पल्याड या चित्रपटांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. Potra Ticha Shahar Honam Pondicherry Rakh and Palayad selected at Goa International Film Festival
सदर ५ मराठी चित्रपटांच्या निवडीसाठी ५ तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत निर्माती अभिनेत्री किशोरी शहाणे वीज , एफटीआयआय चे धीरज मेश्राम , युनेस्को चे ज्युरी मनोज कदम , चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर , चित्रपट लेखक व दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांचा समावेश होता.
या समितीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे २५ चित्रपटांचे परीक्षण करत या ५ चित्रपटांची निवड केली आहे. हे चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी प्रत्येक चित्रपटाचे दोन प्रतिनिधी या प्रमाणे ५ चित्रपटाचे १० प्रतिनिधी पाठविण्यात येणार आहे.
या चित्रपटांच्या निर्मात्यांचे व संपूर्ण चमुचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App