अजितदादांची भावी मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स; दानवे – महाजनांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला संयम राखण्याचा इशारा


प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावली.आमदार अमोल मिटकरींनी तर अजितदादा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे ट्वीट केले. Posters of Ajit Dada’s future Chief Ministership

या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे हेच 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत नेतृत्वात बदल होणार नाही, असा स्पष्ट खुलासा रावसाहेब पाटील दानवे यांनी केला. त्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते एकत्रित बसून पुढच्या नेतृत्वाविषयी चर्चा करतील, असे दानवे यांनी सांगितले.

– गिरीश महाजनांचा इशारा

त्याचवेळी गिरीश महाजन यांनी जळगावत अजितदादांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावणे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा आतातायीपणा आहे. तो त्यांनी करू नये, असा स्पष्ट इशारा दिला. अजितदादांच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या पोस्टर्समुळे अनावश्यक चर्चा होते आणि विषयाला वेगळेच फाटे फुटतात. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी संयम बाळगावा, असा सल्ला त्यांनी दिला.

– हसन मुश्रीफांचाही टोला

राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना असाच टोला हाणली. पोस्टर्स लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी 145 आमदारांचे बहुमत लागते. पण नियतीच्या मनात काय आहे हे माहिती नाही, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी करून राष्ट्रवादीत वेगळा सूर काढला.

Posters of Ajit Dada’s future Chief Ministership

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात