विशेष प्रतिनिधी
वाशी : भारतीय पोस्ट खात्याने २४ तास कुरिअर सुविधा म्हणजे “अनवीत “सेवा उपलब्ध करून दिली आहे. वाशी येथील पोस्ट कार्यालयात या सुविधेच उदघाटन करण्यात आले.आयटीच्या कंपन्या ज्या शहरात अधिक आहेत.तेथे ही सुविधा देण्यात येणार आहेत. अनवीत मशीन तयार करण्यात आली आहे.Postal department started “Anvit” service; get any time courier
यात पोस्टाने आलेला कुरिअर या मशीनमध्ये ठेवण्यात येईल. नंतर ग्राहकाला मेसेज करून ओटीपी देण्यात येईल. हा ओटीपी वापरून कधीही तुमचं कुरिअर मशीनमधून काढून घेऊ शकता, आयटीमध्ये कामला जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा लाभदायक ठरणार आहे.
सध्या नवी मुंबई ,ठाणे , पुणे येथे सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही सुविधा मोफत असून , त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर शुल्क आकारले जाणार आहे. या सुविधेमुळे पोस्ट ऑफिसमधील कारभार आधुनिक होणार असून मनुष्यबळ कमी खर्च होणार असून , ग्राहकाला आपल्या सोईनुसार आपले कुरिअर घेऊन जात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App