‘’अनुदानित आश्रमशाळांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल’’; फडणवीसांचे आश्वासन!

अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी राजावाडी हॉस्पिटल सुसज्ज करणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मेघदूत निवासस्थान येथे स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांबाबत बैठक झाली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सामाजिक न्याय विभागाचे उपस्थित होते. Positive consideration will be given to the demands of aided ashram schools Fadnavis promise

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’विद्यार्थ्यांचे परिपोषण अनुदान वाढवणे तसेच आकस्मिक व सानुग्रह अनुदान यासंदर्भातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचालित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करण्यात येत असून या मागण्यांबाबत सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेण्यात येईल.’’

घाटकोपर पश्चिम येथील रायफल रेंज परिसरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स –

राजावाडी हॉस्पिटल सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी युक्त व कॅशलेस रुग्णालय करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात येतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  मेघदूत निवासस्थान येथे घाटकोपर पश्चिम येथील रायफल रेंज व राजावाडी हॉस्पिटल संदर्भात बैठक झाली. यावेळी आमदार राम कदम, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबईचे पोलिस आयुक्त व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, घाटकोपर येथील रायफल रेंज परिसरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करण्यासंदर्भात मागणी असून यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान रायफल रेंजसाठी पर्यायी जागेची पाहणी पोलिस विभागाने करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. घाटकोपर पश्चिम येथील रायफल रेंज परिसरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स थीम फॉरेस्ट, कृत्रिम तलाव तसेच हा परिसर रमणीय करण्याच्या दृष्टीकोनातून प्रकल्प तयार करता येईल. यासाठी रायफल रेंज पर्यायी जागेत स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे.

Positive consideration will be given to the demands of aided ashram schools Fadnavis promise

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात