शिल्पा आणि राज सध्या हिमाचल प्रदेश मध्ये असून त्यांनी नुकतंच तिथल्या प्रसिद्ध मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आहे. Porn Case: Raj Kundra and Shilpa Shetty appear together for the first time since jail; The couple visited many places of pilgrimage
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पॉर्नोग्राफी निर्मिती करण्याच्या आरोपाखाली ६० दिवसांहून जास्त दिवस तुरुंगात राहिलेल्या राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयातर्फे जामिन मंजूर केला होता. तुरुंगातून घरी परतल्यानंतर राज कुठेही दिसला नव्हता. सोशल मीडियाला देखील त्यानं राम-राम ठोकला आहे. शिल्पानंही त्यानंतर अनेक सण साजरे केले, सोशल मीडियावर फोटो शेअर केले पण त्यात राजचा फोटो नव्हता. आता इतक्या दिवसानंतर दोघंही पहिल्यांदाच एकत्र दिसले.
शिल्पा आणि राज सध्या हिमाचल प्रदेश मध्ये असून त्यांनी नुकतंच तिथल्या प्रसिद्ध मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आहे. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी राज कुंद्राने पिवळा कुर्ता आणि पांढरा पायजामा घातला होता, तर शिल्पा शेट्टी पिवळी सलवार आणि कमीजमध्ये दिसली. दोघांनी मिळून श्री ज्वालामुखी शक्तीपीठाला भेट दिली. यापूर्वी राज कुंद्राच्या जामीनानंतर शिल्पा वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेली होती.
तुरुंगातून सुटल्यापासून फक्त सार्वजनिक ठिकाणीच दिसला नाही तर, तो सोशल मीडियातूनही गायब होता. काही दिवसांपूर्वी राजने त्याचे ट्विटर आणि इन्स्टाग्राम दोन्ही सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले होते. याउलट, शिल्पा सोशल मीडियावर नेहमीप्रमाणेच सक्रिय आहे. .
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App