1999 : राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जाती द्वेषाचे राजकारण जास्त सुरू; राज ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल!!

विशेष प्रतिनिधी

ठाणे : माझी जात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण मी जातीचे राजकारण कधी केले नाही, हा शरद पवार यांनी केलेला दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज फेटाळून लावला. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जाती द्वेषाचे राजकारण जास्त सुरू झाले, असा आरोप त्यांनी पवारांवर केला. Politics of caste hatred started more in Maharashtra only after the establishment of NCP

महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या नामदेव जाधव यांनी शरद पवारांच्या जातीचा मुद्दा बाहेर काढला. शरद पवारांच्या निवडणूक आयोगाचा सादर झालेल्या प्रतिज्ञापत्रावर त्यांची जात मराठा नाही तर ओबीसी आहे, असा दावा जाधव यांनी केला. त्यावरून बराच गदारोळ उठला. शरद पवारांचे 50 वर्षांचे राजकारण अखेरीस जातीच्याच वादावर आले. पवारांनी त्या संदर्भात मोघम खुलासा केला. माझी जात संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, पण मी जातीचे राजकारण कधी केले नाही. यापुढेही करणार नाही, असा दावा पवारांनी बारामतीतल्या गोविंद बागेत पत्रकारांशी बोलताना केला.

मात्र पवारांचा हा दावा राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत फेटाळून लावला. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जाती द्वेषाचे राजकारण जास्त सुरू झाले. त्याआधी महाराष्ट्रात जातीपाती नव्हत्या असे नाही. जाती होत्याच. पण जाती द्वेषाचे राजकारण मात्र राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जास्त सुरू झाले, या अरोपाचा राज ठाकरेंनी पुनरुच्चार केला. याआधी देखील त्यांनी हाच आरोप केला होता.

महाराष्ट्रात हेच जातीद्वेषाचे राजकारण पुढे सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा देऊन राज ठाकरे यांनी मनसेमध्ये कोणत्याही स्थितीत जातीपातीच्या राजकारणाला थारा देणार नसल्याचे आग्रहपूर्वक सांगितले.

Politics of caste hatred started more in Maharashtra only after the establishment of NCP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात