विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना फुटून ठाकरेंकडून धनुष्यबाण निघून गेले आणि आता हातावरून घड्याळही निसटले. एकूणच महाविकास आघाडीचे राजकीय प्रयोजन आता संपले आहे, असेच महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट होत आहे. Political relevance of MVA has come to an end in maharashtra politics
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी महाविकास आघाडी 2024 ची निवडणूक एकत्र लढवेल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. तशी इच्छा असणे वेगळे आणि जागावाटप होऊन ते प्रत्यक्षात घडणे वेगळे, असे वक्तव्य करून संभ्रम निर्माण केल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात तो संभ्रम नाही, तर पवारांनी महाविकास आघाडीचे राजकीय प्रयोजन संपल्याचे सूचक पद्धतीने जाहीर केले आहे.
ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर नवी दिल्लीत खुलासा देताना जरी पवारांच्या वक्तव्याचा अर्थ “तसा” नसल्याचा दावा केला असला तरी मूळातच जी महाविकास आघाडी केवळ आणि केवळ सत्तेसाठी बनविली होती, ती सत्ताच गेल्यानंतर तिचे राजकीय प्रयोजन शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी उरले असले तरी ते तेवढे राष्ट्रवादीसाठी उरलेलेच नाही, असेच दिसून येत आहे.
शिवाय संजय राऊत यांनी जरी शरद पवारांच्या वक्तव्यावर खुलासा करून महाविकास आघाडीशी आणि पवारांशी शिवसेनेचा ठाकरे गट जुळवून घेणार असल्याचे सूचित केले असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र पवारांच्या वक्तव्यातले राजकीय इंगित ओळखून त्यांना “तसाच” प्रतिसाद दिला आहे. जे आमच्या सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन लढू, अन्यथा त्यांना स्वतंत्र विचार करायला मूभा आहे, असे नानांनी राष्ट्रवादीला स्पष्ट सांगून हाताच्या पंजावरून घड्याळ निसटल्याचेच सूचित केले आहे.
महाविकास आघाडीत सध्या संख्याबळाच्या आधारे ठाकरे गट सर्वात कमकुवत आहे. त्यांच्याकडे उद्धव ठाकरे सरकार नेता जरूर आहे पण संख्याबळाअभावी ते नेतृत्व प्रभावहीन झाल्यात जमा आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडीत राहण्याची मूलभूत प्रेरणा “सत्ता” असल्याने आणि ती गेल्याने एकत्र राहण्याची शक्यताच संपली आहे. त्यातूनच शरद पवारांचे मूळ वक्तव्य आणि नाना पटोले यांचे त्यांना “तसे” उत्तर आले आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App