विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यापासून ठाकरे गटातून शिंदे गटाकडे येण्याचा नेत्यांचा आणि शिवसैनिकांचा ओघ वाढला आहे. या सगळ्याचे वर्णन मराठी माध्यमांनी धक्कातंत्र या शब्दाने केले आहे. पण गेल्या काही दिवसातले पक्षप्रवेश पाहतात माध्यमे जरी त्यांचे वर्णन धक्कातंत्र असे करत असली, तरी ते मात्र आपापल्या सोयीचे पक्ष प्रवेश आहेत हेच दिसून आले आहे. Political merry go round in Shivsena, kiritikar father and son and andhare husband wife are in opposite Shivsena
शिवसेनेचे जुने जाणते ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी फार जवळीक नको, असा जाहीर इशारा दिला होता तुम्ही तो निर्णय बदला आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्या, असे ते उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यासपीठावरून म्हणाले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी निर्णय बदलला नाही. त्यामुळे खासदार गजानन कीर्तिकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. हे करताना त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले. इतकेच नव्हे, तर त्यांनी आज तुरुंगातून बाहेर आलेले शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांचे देखील भेट घेतली. अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचा आनंद संजय राऊत यांनी व्यक्त केला. पण गजानन कीर्तिकर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याचे जास्त दुःख जास्त आहे असे ते म्हणाले.
पण कीर्तीकर पिता पुत्रांचा एकाच वेळी दोन शिवसेनेमध्ये असणे हा राजकीय सोयीचा भाग असल्याचे मानले जात आहे. अमोल कीर्तीकरांना एकनाथ शिंदे यांच्याकडून कांदिवली मतदार संघातल्या उमेदवारीचा शब्द हवा होता. तो त्यांनी दिला नाही. त्यामुळे अमोल कीर्तिकर यांचा शिंदे गटातला प्रवेश बाजूला राहिला आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहिले. हे राजकीय इंगित आता उघड झाले आहे.
जे अमोल कीर्तीकर आणि गजानन कीर्तिकर यांचे आहे, तसेच माध्यमांनी ज्यांचे वर्णन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुलख मैदान तोफ असे केले आहे, त्या सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. सुषमा अंधारे यांना आपणच वैचारिक दृष्ट्या घडवले. परिपक्व केले. त्या तोफ वगैरे काही नाहीत, असे वैजनाथ वाघमारे म्हणाल्याचे माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले आहे. वैजनाथ वाघमारे आणि सुषमा अंधारे हे सध्या विभक्त राहतात. यावर देखील त्यांनी खुलासा केला आहे. आपली लढाई वैचारिक आहे. सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांच्या समावेत जावेसे वाटल्याने त्या गेल्या. एकनाथ शिंदे हे विद्रोही आहेत. त्यांच्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झाले म्हणून मी त्यांच्याबरोबर चाललो आहे, असे ते म्हणाले.
पण हा सुद्धा पक्षप्रवेश राजकीय सोयीचा दिसतो आहे. कुठून का होईना, पण राजकीय पक्षात स्थान मिळावे आणि तेथून आपली राजकीय प्रगती व्हावी हाच यामागचा हेतू दिसतो आहे. त्यातही मुंबई सह अन्य 16 महापालिकांच्या निवडणुका जवळ येताना असले सोयीचे पक्षप्रवेश अनेकदा दिसणार आहेत. एखाद्या पक्षातून तिकीट मिळाले नाही तर दुसऱ्या पक्षात… दुसऱ्या पक्षात तिकीट मिळाले नाही तर तिसऱ्या पक्षात…, असा पॉलिटिकल मेरी गो राऊंड सुरू होणार आहे. त्याचीच ही झलक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App