विशेष प्रतिनिधी
पुणे : Arun Lad : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मुंबईत शरद लाड यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे असे सांगितले जात आहे. या प्रवेशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्याचे समजते.
या घडामोडीमुळे सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अरुण लाड हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यामुळे शरद लाड यांचा भाजप प्रवेश हा जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या गटासाठी राजकीयदृष्ट्या धक्कादायक ठरू शकतो.
भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघ जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे पदवीधर मतदार संघाची जबबदारी भाजपने संघ परिवारातील विश्वासू चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेश पांडे यांचावर दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर मतदार संघ आपल्या ताब्यात राहील ह्यासाठी भाजपने चंग बांधल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता शरद लाड यांच्या प्रवेशामुळे भाजपला या मतदारसंघात आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, नुकत्याच विजयादशमीच्या निमित्ताने सांगलीत संभाजी भिडे यांच्या दुर्गामाता दौड कार्यक्रमात शरद लाड यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यानच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अंतिम झाल्याचे सांगितले जाते.
कीय प्रवेश पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असून, येत्या काही दिवसांत येथील राजकीय समीकरणे कशी आकार घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App