राज्यातील ‘ या ‘ सहा जिल्ह्यांमध्ये होणार पोलीस भरती ; ४४४ परीक्षा केंद्र राहणार , जाणून घ्या सविस्तर माहिती

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या ७२० पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याकरिता ११ हजार पोलिसांचा बंदोस्त तैनात करण्यात आला आहे.Police recruitment will take place in six districts of the state; There will be 444 examination centers, know the details


विशेष प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस शिपाई पदाकरिता १९ नोव्हेंबरला लेखी परीक्षा दुपारी तीन ते साडेचार या वेळेत होणार आहे.परीक्षार्थींनी लेखी परीक्षेच्या दोन तास अगोदरच केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे.दरम्यान ६ जिल्ह्यात ४४४ परीक्षा केंद्र उभा राहणार आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिसांच्या ७२० पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याकरिता ११ हजार पोलिसांचा बंदोस्त तैनात करण्यात आला आहे. महत्वाचे कॉपी तसेच डमी परीक्षार्थी, असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग करण्यात येणार आहे.



परीक्षेचा पहिला टप्पा म्हणून लेखी परीक्षा होत असून राज्यभरातून तरुणांनी अर्ज सादर केले. त्यातील पात्र ठरलेल्या १९०३१९ उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षार्थींची संख्या मोठी असल्याने त्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान होते. त्यामुळे यापूर्वी तीन ते चार वेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली.

परीक्षा विना अडथळा पार पाडण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.यामध्ये पाच केंद्रांसाठी एक भरारी पथक आहे. तसेच पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी व इतर तीन पोलीस असा चार जणांचा या प्रत्येक पथकात समावेश राहणार आहे. परीक्षा सुरू असताना हे पथक पाहणी करणार आहे.

जिल्हा केंद्र आणि परीक्षार्थी संख्या

१)नागपूर जिल्ह्यात ४७ केंद्र असून परीक्षार्थी संख्या २४९९४
आहे.
२)नाशिक जिल्ह्यात ३१ केंद्र असून परीक्षार्थी संख्या १३८०० आहे.
३) औरंगाबाद जिल्ह्यात ७७ केंद्र असून परीक्षार्थी संख्या २१७२३ आहे.
४)सोलापूर जिल्ह्यात २५ केंद्र असून परीक्षार्थी संख्या ११८७८ आहे.
५)अहमदनगर जिल्ह्यात ४७ केंद्र असून परीक्षार्थी संख्या १७०६८ आहे.
६) पुणे जिल्ह्यात २१७ केंद्र असून परीक्षार्थी संख्या १००८५६ आहे

Police recruitment will take place in six districts of the state; There will be 444 examination centers, know the details

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात