पोलिसांच्या गाडीखाली आडवा, सरकारी कामात अडथळा म्हणून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोलिसांमध्ये दाखल गुन्हा!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधिमंडळाच्या आवारात झालेल्या मारामारीच्या प्रकरणात पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा समर्थक कार्यकर्ता नितीन देशमुखला अटक केली. पोलिसांनी त्याला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेऊ नये म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली आडवे झाले त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यापूर्वी पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेतली. या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्रचंड चिडचिड झाली. आमदार रोहित पवारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर दादागिरी केली.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातल्या भांडणाचे परिणाम विधिमंडळाच्या आवारातल्या मारामारीत झाले. यामध्ये दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पण पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि अन्य कार्यकर्त्यांच्या विरोधात सुरुवातीला गुन्हे दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड समर्थक कार्यकर्ता नितीन देशमुखला अटक केली.

पोलिसांनी त्याला अटक करू नये आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊ नये म्हणून जितेंद्र आव्हाड विधिमंडळाच्या आवारातच पोलिसांच्या गाडीसमोर बसले त्यावेळी त्यांचे समर्थक त्यांच्या बाजूला जमा झाले होते त्यानंतर जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली गेले. त्यांनी नितीन देशमुखला सोडवायचा प्रयत्न केला. सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांनी याच मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेतली.

रोहित पवारांची पोलिसांवर दादागिरी

मात्र, या सगळ्या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी प्रचंड चिडचिड व्यक्त केली. त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर आणि सरकारवर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला, पण त्याच वेळी आमदार रोहित पवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी केली. नितीन देशमुखला पोलीस कुठे नेतायेत हे पाहायला आम्ही त्यांच्या मागे गेलो होतो परंतु पोलिसांनी आम्हाला ठिकाणी फिरवले नितीन देशमुखचा ठाव ठिकाणा लागू दिला नाही, असा आरोप रोहित पवारांनी केला. रोहित पवारांनी पोलिसांवर पोलीस स्टेशनमध्येच जाऊन प्रचंड चिडचिड केली. पोलिसांना आवाज खाली करा अशी दमदाटी करताना त्यांचा स्वतःचाच आवाज चढला होता.

Police file case against Jitendra Awhad for obstructing government work

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात