पंतप्रधानांचा आज देहू दौरा : पगडीवरचा “नाठाळाचे माथी…” अभंग कोणाला टोचला??; अभंग बदलला!!

प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या देव दौऱ्यात त्यांना भेट देण्यात येणार असल्याचा तुकाराम पगडी वरील अभंग बदलला आहे आधी “भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी” हा अभंग लिहिण्याचा ला होता परंतु हा अभंग कोणालातरी टोचल्याने तो अभंग बदलण्यात आला असून आता त्या जागी “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म सर्व भेदाभेद भ्रम अमंगळ असा हा अभंग” लिहिण्यात आला आहे.PM’s Dehu tour today: Who hit Abhang on the turban? Abhang has changed !

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी, १४ जून रोजी देहू येथे येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच्या शुभहस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि पोलीस विभागामार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याच दरम्यान देहू संस्थानकडून पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार तुकाराम पगडी तयार करण्यात आली. मात्र, त्या पगडीवर समोरच्या बाजूला मध्यभागी लिहिण्यात आलेली अभंग आता बदलण्यात आला आहे.



अभंग का बदलला? 

आधी या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी ॥ हा तुकाराम महाराजांची अभंग लिहिण्यात आली होता. आता या पगडीवरील अभंग बदलण्यात आली असून त्यावर “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ” हा अभंग लिहिण्यात आला आहे. आता हीच पगडी उद्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यात येणार आहे. या पगडीवरील ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’, या पगडीवरील ओव्या कोणत्या कारणास्तव बदलण्यात आल्या?? त्या नेमक्या कोणाला टोचल्या??, यावर आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

PM’s Dehu tour today: Who hit Abhang on the turban? Abhang has changed !

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात