विशेष प्रतिनिधी
पुणे : मागील कित्येक दिवसांपासून रखडलेला पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुल अखेर आता नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. मात्र सिंहगड उड्डाणपुलाबाबत पालिकेकडून अजूनही कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. Pune Municipal Corporation
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन बुधवारी (ता.२०) केले जाणार आहे. हा उड्डाणपूल विद्यापीठ चौकातील राजभवन ते गणेशखिंड रस्त्यापर्यंत आहे. या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. याबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे. Pune Municipal Corporation
हा उड्डाणपूल झाल्याने विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असंही आमदार शिरोळे यांनी म्हटलं आहे. एकीकडे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केले जात आहे. तर दुसरीकडे प्रचंड वाहतुककोंडी होत असलेल्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाबाबत मात्र अजूनही काही अधिकृत माहिती मिळत नाहीये.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल व सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन एकाच दिवशी होणे अपेक्षित होते. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेला १५ तारखेपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र ती ही आता संपली आहे. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या एका बाजूचे लोकार्पण काही महिन्यांनपुर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं होतं. या उड्डाणपुलाची एक बाजू गोएल गंगा जवळ आहे, तर दुसरी बाजू ही इनामदार चौकापर्यंत जाते. Pune Municipal Corporation
काम होऊनही उड्डाणपुलाचे उद्घाटन नाही?
जवळपास ११८ कोटी रुपये खर्चून सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच काम करण्यात आलेलं आहे. मात्र काम पूर्ण झालेले असून सुद्धा हा उड्डाणपूल अजून देखील नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाहीये. याबाबतीत अनेक कारणं महापालिकेकडून दिली जात आहेत. उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी एखादा आमदार, पुढारी किंवा लोकनेता मिळत नसल्याचही महापालिकेने सांगितलं.
उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही हा उड्डाणपूल अद्याप नागरिकांसाठी खुला केला गेलेला नाहीये. यामुळे अनेक नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होत असल्यामुळे, प्रशासनाने लवकरात लवकर उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करावा, असं आवाहन स्थानिक रहिवासी महापालिकेला करत आहेत. Pune Municipal Corporation
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्यात पाऊसाचा जोर वाढतांना दिसतोय. अशात सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या अधिकचं भेडसावत आहे. जवळपास २ कि.मी. लांबीचा हा उड्डाणपूल आहे, हा उड्डाणपूल खुला केल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सहज सुटू शकतो. मात्र अजूनही हा नागरिकांसाठी खुला केला जात नाहीये. महापालिका प्रशासन याबाबतीत नागरिकांना वेठीस धरत आहे का?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App