पंतप्रधान मोदींनी केला महाराष्ट्रात सात ठिकाणी 91FM केंद्रांचा शुभारंभ

जाणून घ्या, महाराष्ट्रातील ती कोणती सात ठिकाणे आहेत?

विशेष प्रतिनिधी

 मुंबई : देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी देशभरात १८ राज्यांमध्ये 91एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज(शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. यामध्ये महाराष्ट्रामधील सात ठिकाणांचा समावेश आहे. PM Modi inaugurated 91FM centers at seven locations in Maharashtra

महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील सिरोंचा, अहेरी तसेच नंदूरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, सटाणा या सात ठिकाणी एमएफ सेंटर्सचा शुभारंभ झाला आहे. माहितीचा वेळेवर प्रसार, शेतीसाठी हवामान अंदाज, महिला बचत गटांना नवीन बाजारपेठेशी जोडणे यामध्ये एफएम ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील.

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका निवेदनात म्हटले आहे की, सरकार देशात एफएम कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. देशभरातील ८४ जिल्ह्यांमध्ये 91 नवीन 100W FM ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. विशेषत: सीमावर्ती भागात रेडिओ कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एफएम ट्रान्समीटरचा विस्तार करण्यात आला आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचा व लडाख आणि अंदमान-निकोबार बेटे यांचा समावेश आहे.

PM Modi inaugurated 91FM centers at seven locations in Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात