एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल; खासगी बस प्रवासामुळे खिशाला कात्री

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे सलग दुसऱ्या दिवशी अनेक प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.खासगी बसचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. Plight of passengers due to strike of ST employees; Private bus travel scissors pocket

राज्यातील बहुतांश एसटी आगारांतील बस सेवा ठप्प होण्यास सोमवारी पहाटेपासून सुरुवात झाली. ती मंगळवारी देखील सुरु होती. औरंगाबाद विभागातील ४७, मुंबई विभागातील ४५ पैकी ३९ आगारे, नागपूर विभागातील २६ आगारे, पुणे विभागातील ५५ पैकी ५२ आगारे, नाशिक विभागातील ४४ पैकी ४३ आगारे, अमरावती विभागातील ३३ आगारे बंद आहेत. राज्यातील २५० पैकी २४० आगारे सायंकाळी सहापर्यंत बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दिवाळी साजरा करुन घरी परतणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला.



खासगी बसचा आधार घेताना अनेकांच्या खिशाला कात्रीही लागली. एसटी सेवा सुरु होईल या आशेने प्रवाशांची गर्दी स्थानकांत होती. मुंबई विभागातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आगार पूर्णत: बंद राहिले. मुंबईतील कु र्ला नेहरु नगर आणि परेल आगार सकाळी बंद झाल्यानंतर पुन्हा या आगारातून काहीअंशी फे ऱ्या सुरु झाल्या. मुंबई ते पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी, शिवशाही, अश्वमेध आणि साध्या बसगाडय़ांच्या सेवाही होऊ न शकल्याने या दोन शहरांदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांनी रेल्वे आणि खासगी बस सेवेचा आधार घेतला. एसटीचे आगाऊ आरक्षण के लेल्यांनी तिकीटांचा परतावा घेण्यासाठी तिकीट खिडक्यांवर गर्दी केली होती.

Plight of passengers due to strike of ST employees; Private bus travel scissors pocket

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात