विशेष प्रतिनिधी
हिंगोली : Phaltan Doctor Suicide फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली असून या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.Phaltan Doctor Suicide
या संदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष नितीन काळे, दुर्गा महिला मंचाच्या सिध्दी संकपाळ, कोषाध्यक्ष संतोष ममदापुरे, सरचिटणीस समीर भाटकर यांनी शासनाकडे निवेदन सादर केले आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकिय अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दुर्देवी असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला चीड आणणारी आहे.Phaltan Doctor Suicide
या प्रकरणातील महिला वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्याया संदर्भात संबंधितांकडे वारंवार लेखी तक्रार करून देखील त्याची वेळीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळेच महिला वैद्यकिय अधिकाऱ्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या महत्वपूर्ण कामकाजा बरोबरच पोलिस विभागाच्या गुन्हे प्रगटीकरणा संदर्भात सहाय्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेतील वैद्यकिय अधिकारी पार पाडत आहेत. त्यांच्यावर नियमबाह्य काम करण्यासाठी समाजकंटक तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून वारंवार दबाव आणल्याच्या घटना घडत आहेत.
फलटण येथील दुर्दैवी घटनेत जबाबदार असणाऱ्या आरोपींची तातडीने चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा करावी तसेच रुग्णसेवेचे काम करणाऱ्या सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांना तसेच दिवंगत महिला डॉक्टरच्या कुटुंबाला पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची अग्रही मागणीही राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. या संदर्भात शासनाच्या भुमीकेकडे महासंघाचे लक्ष लागले आहे.
राजपत्रित वैद्यकिय अधिकारी करणार आंदोलन
या संदर्भात राजपत्रित वैद्यकिय अधिकारी गट अ संघटनेनेही शासनाकडे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणात दोषींवर १० दिवसांत कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App