मराठा आंदोलनात हिंसाचार; समाजकंटकांवर कारवाईसाठी गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका

प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनात जाळपोळ, हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 8 नोव्हेंबरला सुनवणी होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार आहे. Petition of Gunaratna Sadavarten in the High Court for action against social problems

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ अंतरवलीस साठी त्यांच्या भेटीला पोहोचले आहे. पण मराठा आंदोलनाला महाराष्ट्रात हिंसक वळण लागले. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर या दोन आमदारांची घरे पेटवली. गाड्या जाळल्या. अनेक ठिकाणी हॉटेल, घरे, वाहने आंदोलकांनी जाळली. त्यामुळे तब्बल 12 कोटींचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन तपशीलवार माहिती दिली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील आपल्या घराच्या जळीत प्रकरणात समाजकंटक असल्याचे सांगितले.

या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनात घुसलेल्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे सरकारला भाग पाडावे, अशी मागणी करणारी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली आहे.

आमदार बच्चू कडूंचा आरोप

अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आरक्षण मिळण्यास उशीर झाला, असा आरोप विधान आमदार बच्चू कडू यांनी केला. मराठा नक्षलवादी नाहीत. तेही सर्वसामान्य शेतकरी आहेत, त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे, असे बच्चू कडूंनी सांगितले.

राज्यातील मराठा आंदोलन तीव्र असतांनाच नाशिकच्या कळवण येथील कोल्हापूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात येत आहे. मराठा आंदोलकाने राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छायाचित्रासह लावण्यात आलेला शुभेच्छा बॅनर फाडून आपला रोष व्यक्त केला. सरकारने आरक्षण न देता मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करीत मराठा आंदोलकांनी निषेध केला.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आमदारांची उडी

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आता आमदारांनीही उडी घेतलीय. एकीकडे आमदारांनी सलग तिस-या दिवशी आंदोलन केलं तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांनीही विधान भवन परिसरात एका दिवसाचं आंदोलन केलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांची भेट घेऊन विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली.

आरक्षणामध्ये कुणी आला तर त्याच्या नरडीचा घोट घेईन

मराठा समाजाला मिळणा-या आरक्षणामध्ये कुणी आला तर त्याच्या नरडीचा घोट घेईन असं धक्कादायक विधान आमदार संजय गायवाड यांनी केलंय. बुलढाण्यातील मोताळ्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलंय. मागच्या वेळी आरक्षण मिळालं त्यावेळी गुणरत्न सदावर्तेंनी थयथयाट केला. मात्र आता हे सहन करणार नाही, जो कुणी आरक्षणाच्या आड येईल त्याचा जीव घेईन असं आ. संजय गायकवाड यांनी म्हंटलंय.

Petition of Gunaratna Sadavarten in the High Court for action against social problems

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात