Devendra Fadnavis : प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचे कालबद्ध मूल्यमापन,

Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन


विशेष प्रतिनिधी

नागपूर : Devendra Fadnavis प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचे कालबद्ध मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. काही मंत्र्यांनी पुरेशी कार्यक्षमता न दाखविल्याने तर काहींना पक्षसंघटनेत जबाबदारी द्यायची असल्याने मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांत होईल, असेही त्यांनी नमूद केले.Devendra Fadnavis



राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विधिमंडळ कामकाज, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि राज्यातील हिंसक घटना आदी विविध विषयांवर भाष्य केले. मंत्रीपद अडीच वर्षांसाठी देण्यात आले असून ते या कालावधीनंतर सोडण्यात येईल, असे शपथपत्र शिवसेनेने मंत्र्यांकडून घेतले आहे, तर पवार यांनीही तसे मत व्यक्त केले आहे. या पाश्वभूमीवर विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचा कालबद्ध आढावा घेऊन गरजेनुसार आवश्यक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

विरोधक संख्येने कमी असले तरी त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी मांडलेल्या मुद्द्यांवर सरकार निश्चितपणे विधिमंडळात चर्चेला सामोरे जाईल. पण त्यांनी गोंधळ घालून चर्चेपासून पळ काढू नये. आम्ही कोणाचाही आवाज दाबणार नाही किंवा चर्चेपासून मागे हटणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

शिवसेनेत अनेक नेत्यांची मंत्रीपद भूषविण्याची कार्यक्षमता असल्याने सर्वांना संधी मिळावी, यासाठी अडीच वर्षांसाठी मंत्रीपद देण्याचा निर्णय शिवसेनेने पक्षपातळीवर घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र याचा अर्थ मंत्र्यांना अडीच वर्षे काहीही करण्याची मुभा नसून त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस अडीच महिन्यांनंतरही मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करेल, अशी मिश्कील टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

Periodic evaluation of performance of each minister, Statement by Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात