विशेष प्रतिनिधी
मुंबई : लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत खेळला जाणारा लुडो खेळ कौशल्याचा नसून नशिबाचा आहे, असे घोषित करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. people using Ludo game for gambling
लहानपणापासून अनेक जण लुडो हा खेळ खेळत असतात. पूर्वी पुठ्यावर येणारा हा खेळ आता मोबाईलमध्येही सहज उपलब्ध होतो. मात्र आता आॅनलाईनवर लुडो खेळताना त्याचा जुगार खेळण्यासाठी वापर केला जात आहे, असा आरोप याचिकेत केला आहे. सुप्रीम ॲपवर हा खेळ पैसे लावून खेळला जात आहे. त्यामुळे जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा होत आहे. त्यामुळे सरकारने यावर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी केशव मुळे यांनी ॲड. निखिल मेंगडे यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. खंडपीठाने याबाबत राज्य सरकारला नोटीस बजावली असून खुलासा करण्याचे निर्देश दिले. याचिकेवर २२ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App