पेगासस स्पायवेअरच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला “सुपारी मीडिया” म्हणून संबोधले आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकन वृत्तपत्राने एका बातमीत दावा केला आहे की, भारत आणि इस्रायल यांच्यात 2017 मध्ये अत्याधुनिक शस्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या सुमारे दोन अब्ज डॉलर्सच्या करारामध्ये पेगासस स्पायवेअर आणि क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी प्रामुख्याने होती.Pegasus Controversy The New York Times is a not Reliable media says Union Minister V K Singh
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पेगासस स्पायवेअरच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला “सुपारी मीडिया” म्हणून संबोधले आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकन वृत्तपत्राने एका बातमीत दावा केला आहे की,
भारत आणि इस्रायल यांच्यात 2017 मध्ये अत्याधुनिक शस्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या सुमारे दोन अब्ज डॉलर्सच्या करारामध्ये पेगासस स्पायवेअर आणि क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी प्रामुख्याने होती.हे वृत्त समोर आल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राहुल गांधींनी तर मोदी सरकारवर देशद्रोहाचा आरोप केला.
Can you trust NYT?? They are known " Supari Media ". https://t.co/l7iOn3QY6q — Gen VK Singh(MODI KA PARIWAR) (@Gen_VKSingh) January 29, 2022
Can you trust NYT?? They are known " Supari Media ". https://t.co/l7iOn3QY6q
— Gen VK Singh(MODI KA PARIWAR) (@Gen_VKSingh) January 29, 2022
न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीला उत्तर देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी ट्विट केले की, “तुम्ही NYT वर विश्वास ठेवू शकता का? ते ‘सुपारी मीडिया’ म्हणून ओळखले जाते.”
गेल्या वर्षी या प्रकरणावर बराच वाद झाला आणि विरोधी पक्षांनी सरकारवर हेरगिरीचा आरोप करत संसदेत गोंधळ घातला. मात्र, सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते.इस्रायली स्पायवेअर ‘पेगासस’च्या माध्यमातून भारतीय नागरिकांची कथित हेरगिरी केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.काही आंतरराष्ट्रीय मीडिया गटांच्या संघटनेने दावा केला की पेगाससचा वापर अनेक भारतीय राजकारणी, मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि पत्रकार यांच्या विरोधात केला गेला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App