पवारांच्या पक्षाला कर्नाटकात 0.5 % पेक्षाही कमी मते आणि त्यांनी मोदींवर बोलावे??; फडणवीसांचा खोचक सवाल

प्रतिनिधी

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या उत्साहाबरोबरच प्रादेशिक नेत्यांचा उत्साह देखील वाढला आहे. त्यांना एकजुटीची स्वप्न पडून केंद्रात 2024 च्या निवडणुकीत मोदींचा पराभव दिसू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील तशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.Pawar’s party less than 0.5% votes in Karnataka and he should talk about Modi??; Fadnavis’s question

मात्र या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. कर्नाटकात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 0.5% पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निपाणीतला त्यांचा उमेदवार पार्सल पॅक करून पाठवून द्या, असे मी सांगितले होते. निपाणीच्या जनतेने माझे ऐकले. पण शरद पवार जर मोदी हे तो मुनकीन है असे राहिले नाही, असे बोलत असतील तर त्यांच्या प्रतिक्रियेला किती महत्त्व द्यायचे??, असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला.



 

कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी आणि बाकीच्या प्रादेशिक नेत्यांनी महाराष्ट्र जिंकला. देश जिंकला, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पण ती वस्तुस्थिती नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात स्थानिक महापालिका, नगरपालिका निवडणुकीत भाजपचा प्रचंड विजय झाला आहे. त्यामुळे विरोधकांचे देश जिंकण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी देखील कर्नाटकात काँग्रेसच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना या शब्दांत त्यांची संभावना केली. कर्नाटक निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही उमेदवार नव्हता. त्यांच्या पक्षाचे नेते अस्तित्वही नाही. त्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करायची??,णार असा टोलाही फडणवीसांनी हाणून घेतला.

Pawar’s party less than 0.5% votes in Karnataka and he should talk about Modi??; Fadnavis’s question

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात