सातारा + माढ्यात राष्ट्रवादीकडे “सक्षम” उमेदवारांचे “दुर्भिक्ष्य”; पवारांचे फक्त बारामती वर लक्ष!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आलेल्या 10 जागांपैकी फक्त 7 जागांचे उमेदवार शरद पवार जाहीर करू शकले आहेत. सातारा आणि माढा या बारामती शेजारच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये पवारांना “सक्षम” उमेदवारांचे “दुर्भिक्ष्य” जाणवत आहे, पण पवारांनी त्याकडे दुर्लक्ष करून फक्त बारामतीवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे. Pawar’s only focus on Baramati

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत लक्ष घालून इंदापुरातले पवार समर्थक प्रवीण माने यांना अजितदादांकडे वळविल्यानंतर अस्वस्थ झालेल्या शरद पवारांनी दौंड मध्ये लक्ष घालून तिथले माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न चालवला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत शरद पवारांनी प्रेमसुख कटारिया यांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा केल्याची बातमी आहे. प्रेमसुख कटारिया हे भाजप आमदार राहुल कुल यांचे समर्थक मानले जातात त्यांना राहुल कुल यांच्यापासून फोडून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या कामाला लावण्याचे शरद पवारांचे प्रयत्न आहेत.

एरवी पवार संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून सगळेच शेवटची सभा बारामतीत घेत असत. पण आता बारामतीची “अमेठी” होण्याच्या भीतीने पवारांनी बाकीचे सगळे मतदारसंघ सोडून देऊन बारामतीत तळ ठोकला आहे. आपल्या सगळ्या जुन्या राजकीय वैऱ्यांना पवारांना जवळ करावे लागत आहे. म्हणूनच पवारांनी मध्यंतरी भोर मध्ये जाऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यांच्या पाठोपाठचा दौंड मध्ये प्रेमसुख कटारिया यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

एकीकडे पवारांना सातारा आणि माढा या दोन मतदारसंघांमध्ये “सक्षम” उमेदवार सापडत नाहीत, आमदार शशिकांत शिंदे यांनी पवारांची भेट घेऊन साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे, पण त्याकडे पवारांनी दुर्लक्ष करून फक्त बारामती वर कॉन्सन्ट्रेट केल्याचे त्यांच्या सगळ्या राजकीय हालचालीतून दिसून येत आहे.

Pawar’s only focus on Baramati

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात