पवारांची डबल गेम : अजितदादा, प्रफुल्ल पटेलांसह राष्ट्रवादीचे 9 मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पवारांच्या भेटीला!!

प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डबल गेमचा पुढचा अंक सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रतिभाताई पवारांना भेटण्याच्या निमित्ताने अजितदादा परवा सिल्वर ओक वर जाऊन आले. उद्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील 9 मंत्री शरद पवारांच्या भेटीला यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पोहोचले.Pawar’s double game: Ajitdada, Praful Patel along with 9 NCP ministers meet Pawar at Yashwantrao Chavan Center!!

शरद पवार एकीकडे उद्याच बंगलोर मध्ये विरोधी ऐक्याच्या बैठकीत सामील होण्यासाठी जाणार आहेत. त्याच्या आदल्याच दिवशी आज राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना ते यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेटत आहेत. त्यामुळे पवारांच्या डबल गेमची देशात चर्चा सुरू होण्याबरोबरच विरोधी ऐक्यात ते खोडा घालतील, अशी चर्चा देखील वेग पकडत आहे.



राष्ट्रवादीतील फुटीला 15 दिवसही उलटले नाही, तोच महाराष्ट्रातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या एक दिवस आधीच हे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह सर्वच मोठे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. शरद पवार हे मंत्रालयासमोरीलच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहेत. तिथेच हे मंत्री पवारांना भेटायला गेले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे मंत्री शरद पवार यांनी भेटायला गेले आहे. विशेष म्हणजे उद्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच हे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार दुसऱ्यांदा भेटीला

दरम्यान, या मंत्र्यांसोबत अजित पवारही आले आहेत. अजितदादा दुसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार हे परवाच शरद पवार यांच्या घरी गेले होते. त्यांची काकू प्रतिभा पवार या आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी अजित पवार गेले होते. अजितदादानंतर आता राष्ट्रवादीचे मंत्रीही शरद पवार यांना भेटायला गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जयंत पाटील. आव्हाड चव्हाण सेंटरकडे

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चव्हाण सेंटरकडे जायला निघाले आहेत. चव्हाण सेंटरला कोण आलंय हे माहीत नाही. मला सुप्रिया सुळे यांचा फोन होता. त्यामुळे मी वायबी चव्हाण सेंटरकडे जात आहे, असं जयंत पाटील म्हणाले. मात्र, त्यांनी या भेटीवर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

Pawar’s double game: Ajitdada, Praful Patel along with 9 NCP ministers meet Pawar at Yashwantrao Chavan Center!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात