विशेष प्रतिनिधी
मुंबई : लग्न नाही झाले, तरी संसार एकत्र करू लागले, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ऐक्याची खिल्ली उडवली. Pawar uncle – nephew’s unity is revealed by Ambedkar!!
दोन्ही राष्ट्रवादी एक होऊ शकतात. सुप्रिया सुळेंनी निर्णय घ्यायचा आहे, असे सांगून शरद पवारांनी मध्यंतरी राष्ट्रवादीच्या एकीकरणाची पुडी सोडून दिली होती. त्यावर मराठी माध्यमांनी खूप चर्चा केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र ही चर्चा नाकारली. दोन्ही राष्ट्रवादीच्या ऐक्यावर अधिकृतपणे कुठेही चर्चा सुरू नसल्याचे स्वतः अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी सांगितले. नंतर प्रफुल पटेल यांनी देखील त्यांचीच री ओढली. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आपल्या सत्तेच्या तुकड्यातला वाटा खेचायला येण्याची भीती अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटली. म्हणून त्यांनी ऐक्याची चर्चा झटकली.
मात्र, प्रकाश आंबेडकरांनी वेगळ्याच मुद्द्यावर सोशल मीडिया पोस्ट करून काका – पुतण्याच्या राजकीय ऐक्याची पोल खोलली. अनेक साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी किंवा त्यांच्या राष्ट्रवादीने अधिकृतपणे कुठलेच पॅनेल उभे केले नाही. अजित पवारांची वेगवेगळी माणसे वेगवेगळ्या पॅनल मधून लढत आहेत. नेमक्या याच मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांनी बोट ठेवले.
– प्रकाश आंबेडकर यांनी लिहिले :
साखर कारखान्यांच्या निवडणुका सुरू आहेत. यामध्ये कुठेही शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवत नाहीये.
अजित पवार हेच या निवडणुका पूर्णपणे हाताळत आहेत.
अजून लग्न ही झाले नाही परंतु, नवरा-नवरी एकत्र संसार करायला लागलेत!
वाह, काय जोडा आहे!
: ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App