नाशिक : महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू ठामपणे एकत्र एकत्र आल्यानंतर त्यांच्या पक्षांच्या वाट्यात खोडा घालायचा डाव पवार काका – पुतण्यांनी खेळलाय. मुंबई आणि नाशिक मध्ये ठाकरे बंधूंशी आघाडी करायची खेळी करून त्यांच्या जागांमध्ये घट करायची हा डाव पवार काका – पुतणे खेळत असल्याचे समोर आलेय.
जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या घरी
मुंबई महापालिकेत शिवसेना आणि मनसे यांचे जागावाटप जवळपास निश्चित होत आले असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले तिथे त्यांनी 25 ते 30 जागांचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिल्याचे माध्यमांनी सांगितले प्रत्यक्षात दोन्ही बाजूंनी नेमक्या किती जागांचा प्रस्ताव आलाय किंवा दिलाय यावर भाष्य केले नाही पण जयंत पाटील हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले हे मात्र निश्चित.
– पवारांचा नेमका हेतू काय??
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी बोलणी सुरू असताना मध्येच उद्धव ठाकरेंशी बोलणी सुरू करून पवारांनी ठाकरे बंधूंची युती जाहीर करायला वेळ लागावा, यासाठी हा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. वास्तविक मुंबईत अखंड राष्ट्रवादीची स्थापना सिंगल डिजिट नगरसेवकांची होती. त्यात राष्ट्रवादी फुटल्यानंतर ती ताकद आणखी घटली, तरी देखील आपले राजकीय अस्तित्व टिकवणे यापेक्षा ठाकरे बंधूंचे राजकीय अस्तित्व बिघडवणे, या हेतूनेच पवारांनी जयंत पाटलांना उद्धव ठाकरेंकडे पाठविल्याची अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे.
– नाशिक मध्ये पवार पुतण्याचा डाव
एकीकडे पवार काकांनी ठाकरे बंधूंवर हा मुंबईत हा डाव टाकला असताना, दुसरीकडे पवार – पुतण्याने नाशिक मध्ये ठाकरे बंधूंवर दुसरा डाव टाकलाय. नाशिक मध्ये सुद्धा शिवसेना आणि मनसे यांचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देविदास पिंगळे यांनी शिवसेनेचे नेते वसंत गीते यांच्याकडे एकत्रित निवडणूक लढवायचा प्रस्ताव पाठविला. नाशिक मध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादींची ताकद घटली. भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर ठेवले. भाजपने कसेही करून राष्ट्रवादीला महायुतीत घ्यावे यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडी मागे धावले पण भाजपने त्यांना विचारले नाही. म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उबाठा शिवसेना आणि मनसेच्या युतीत शिरकाव करायचा डाव खेळला. ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये खोडा घालणे. त्यांच्या युतीची जागा वाटपाची चर्चा लांबविणे त्यापलीकडे पवार काका – पुतण्यांचा दुसरा कुठलाही हेतू नसल्याचे यातून स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App