नाशिक : शिक्षकांच्या आंदोलनात पवार + ठाकरेंची राजकीय घुसखोरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पुरती पोलखोल केली!!, असे आज विधान परिषदेत घडले.
विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन केले. सुरुवातीला या शिक्षकांनी कुठल्याही राजकीय पक्षांचा पाठिंबा मागितला नव्हता. पण नंतर त्या शिक्षकांच्या आंदोलन स्थळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार पोहोचले. रोहित पवार तिथे रात्रभर थांबले. राज्यात अजित पवार अर्थमंत्री पदावर आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमच्या मागण्या मांडा अशी विनंती शिक्षकांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.
– सुप्रिया सुळेंची अजितदादांची पाठराखण
त्यावर सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची पाठराखण केली, पण देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली. अजितदादा अर्थमंत्री असले तरी निर्णय फडणवीस घेतात त्यामुळे तुमच्या मागण्या पूर्ण न होण्यामागे फडणवीस आहेत, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. त्यानंतर आज शरद पवार आंदोलन स्थळी पोहोचले. त्यांनी तिथे भाषण केले. यावेळी खासदार निलेश लंके त्यांच्यासमवेत होते. 1981 मध्ये शिक्षकांसाठी आपण काही चांगले काम केले याची आठवण पवारांनी सांगितली तुमच्या मागण्या एक दिवसात सरकारकडून मान्य करून घेतो असे आश्वासन पवारांनी त्या शिक्षकांना दिले.
– पवारांच्या पाठोपाठ ठाकरे आंदोलन स्थळी
शिक्षकांच्या आंदोलनाचा राजकीय लाभ पवारांना होतोय, हे पाहून उद्धव ठाकरे तिथे पोहोचले. त्यांनी शिक्षकांसमोर भाषण केले गिरणी कामगार आणि शिक्षक आणि बाकीचे विरोधी पक्ष मिळून भाजप सरकारला असा करंट देऊ की ते सत्तेच्या खुर्चीवरून उडून खाली पडले पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर होते.
– काँग्रेस – राष्ट्रवादी कडून शिक्षकांना फुटकी कवडी नाही
शिक्षकांच्या आंदोलनाच्या अडून पवार आणि ठाकरेंनी आपले राजकारण साधून घेतले. काँग्रेसचे विधान परिषदेतले आमदार सतेज पाटील यांनी हा विषय विधान परिषदेत उपस्थित केला. शिक्षकांच्या मागण्या किती दिवसांपासून प्रलंबित आहेत याचे वर्णन करणारे भाषण त्यांनी केले. सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. शिक्षकांना फुटकी कवडी न देणारे आज त्यांच्या आंदोलनाच्या अडून राजकारण साधून घेत आहेत असा आरोप फडणवीस यांनी केला. “कायमचे विनाअनुदानित” हे शब्द काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने घातला. त्यानंतर “कायमचे” हा शब्द काढला, पण त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने शिक्षकांना फुटकी कवडी दिली नाही.
– शिक्षकांना लाभ महायुतीने दिले
2014 नंतर महायुती सरकारने शिक्षकांना लाभ मिळवून दिले. 2019 नंतर अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा देखील त्या सरकारने शिक्षकांना काही दिले नाही. त्यानंतर गेल्या अडीच वर्षांमध्ये आधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आणि आता भाजप महायुती सरकारने शिक्षकांना वेगवेगळे लाभ मिळवून दिले. ज्यांनी आपल्या राजवटीत शिक्षकांना काही दिले नाही, त्यांनी आंदोलन स्थळी जाऊन राजकारण केले. शिक्षकांना लाभ मिळवून द्यायला उशीर झालाय हे सरकारला मान्य आहे, पण आम्ही शिक्षकांना लाभ दिल्याशिवाय राहणार नाही. मंत्री गिरीश महाजन यासंदर्भात शिक्षकांचे बोलतायेत, असे फडणवीस यांनी सांगितले. पण शिक्षकांना लाभ मिळवून द्यायचे आश्वासन देताना त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची पुरती पोलखोल केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App