जालन्यातील मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर पवारांचा काल फडणवीसांवर निशाणा; आज एकनाथ शिंदे टार्गेटवर!!


प्रतिनिधी

जालना :  जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतले मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यामध्ये शिरलेले राजकारण आता शिगेला पोहोचत आहे. तिथल्या पोलीस लाठीमाराच्या मुद्द्यावर काल शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता, आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले आहे.Pawar targeted Fadnavis yesterday on the issue of Maratha agitation in Jalanya; Today Eknath Shinde at Target!!

जालना जिल्ह्यातील अंबडमधील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांवर दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला पण त्यामुळे राज्यात संतप्त वातावरण निर्माण झाले. राज्यात सात ठिकाणी 37 एसटी बस पेटविल्या. सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.


जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…


पण त्या पलीकडे जाऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात राजकारणही शिरले. माजी खासदार छत्रपती संभाजी राजे, खासदार छत्रपती उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आंदोलकांच्या भेटीला पोहोचले. शरद पवारांनी नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आप्पाकडे केली एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आंदोलनकर्ते चिडले होते. पण त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता, तरी त्यांच्यावर लाठीमार केला असा आरोप पवारांनी केला.

काल शरद पवारांनी जालन्यातल्या लाठी माराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले.

शरद पवारांनी आंदोलनस्थळी जात उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत हा संघर्ष शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचा इशाराही सरकारला दिला. यावेळी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते. या घटनेचा करावा तितका निषेध कमी आहे, असे म्हणत पवारांनी आंदोलनस्थळावर पोलिासांचा मोठा फौजफाटा आणला गेल्याचा आरोपही केला.

शरद पवार म्हणाले, “मराठा समाजावर झालेला अमानुष लाठीमार पाहूनच आलो आहे. यात 80 ते 90 आंदोलक जखमी झाले. या आंदोलनाशी काही संबंध नसणाऱ्यांनाही झोडपण्यात आले. यानंतर अज्ञात 350 ते 400 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येथे कारण नसतानाही पोलिसांचा मोठा फौजफाटा आणला गेला. आता यापुढे शांततेच्या मार्गाने संघर्ष करू, असा इशारा पवारांनी दिला.

सरकारने फक्त अश्वासन दिले पण त्याची पूर्तता केली नसल्याचा आरोपही पवारांनी यावेळी केला. ते म्हणाले, या पूर्वीही मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने आंदोलने केली, मात्र असे प्रकार घडले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. शब्द पळला नसल्यानेच आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांवर पोलिसांकडून जोरदार लाठीहल्ला केला. एवढेच नाहीतर हवेत गोळीबारही करण्यात आला. एका बाजूला चर्चा सुरू ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला लाठीहल्ला करायचा. आंदोलन दाबण्यासाठी सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही पवारांनी केला.

Pawar targeted Fadnavis yesterday on the issue of Maratha agitation in Jalanya; Today Eknath Shinde at Target!!

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात