
विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्याच घरात लढाई लावून मी चूक केली. तीच चूक विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी केली आहे,असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज शरद पवारांना लगावला.Ajit Pawar
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे केले होते. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात ननंद विरुद्ध भावजय अशी लढत झाली. त्यामध्ये सुनेत्रा पवारांना पराभव पत्करावा लागला. पण अजितदादांनी सुनेत्रा पवारांना महायुतीतून राज्यसभेवर पाठवले. पवारांच्या घराण्यातच लढाई लावली, ही आपली चूक होती, अशी कबुली नंतर त्यांनी दिली.
आता शरद पवारांनी अजित पवारांचे सख्खे पुतणे श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवार यांना अजितदादांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघात उतरविले आहे. पवारांनी देखील अजित पवारांनी केलेली चूकच रिपीट केली त्यावरूनच अजितदादांनी शरद पवारांना टोला हाणला. दादाच्या विरोधात घरातलाच उमेदवार उतरवू नका, असे माझ्या आईने डोळ्यात पाणी आणून सांगितले, तरी त्यांनी ते ऐकले नाही, असे अजितदादा म्हणाले.
Pawar repeated my own mistake in Baramati; Ajitdad’s gang after filling the nomination form!!
महत्वाच्या बातम्या
- Congress अखेर 100 + पार; महाविकास आघाडीतल्या जागावाटपात ठाकरे + पवारांवर मात!!
- Sharad Pawar : यंदाच्या निवडणुकीत पवारांची यंग ब्रिगेड मैदानात, पण सगळे घराणेशाहीचे प्रतिनिधी!!
- Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचा महाराष्ट्रातील जागावाटपावरून ‘मविआ’ला इशारा!
- Siddhi Kadam रमेश कदम यांच्या मुलीला शरद पवारांनी दिली मोहोळमधून उमेदवारी, सर्वात कमी वयाची उमेदवार