प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज उभी फूट पडली. 36 आमदार अजित पवारांकडे आणि 16 आमदार शरद पवारांकडे असे दोन मेळाव्यांमध्ये विभागले गेले. अजित पवारांनी शरद पवारांच्या राजकारणाचे जे वाभाडे काढले, त्या वाभाड्यांना शरद पवारांनी आज उत्तर देणे टाळले. पवारांचे आजचे भाषण आक्रमक नव्हे, तर पूर्णपणे बचावात्मक ठरले Pawar refused to respond to Ajitdad’s allegations
अजित पवारांनी आपल्या भाषणात 2014 2017 आणि 2019 या तीन वर्षांमध्ये भाजप बरोबर जाण्याचा शरद पवारांनी कसा प्रयत्न केला होता, कुणाबरोबर बैठका झाल्या, कोणत्या उद्योगपतीने त्यात सहभाग घेतला, याचे सविस्तर वर्णन करून सांगितले आणि त्या प्रत्येक वेळी शरद पवारांनी भाजप नेतृत्वासमोर एक सांगितले आणि नंतर वेगळी भूमिका घेत दुटप्पी राजकारण केले असा आरोप केला. या आरोपांना आपल्या भाषणात शरद पवारांनी अजिबात प्रत्युत्तर दिले नाही.
भाजप जातीयवादी आहे. शिवसेनेचे आणि भाजपचे हिंदुत्व वेगवेगळे आहे. शिवसेनेचे हिंदुत्व सर्व जाती धर्मांचे आहे, तर भाजपचे हिंदुत्व प्रतिगामी आणि मनुवादी आहे अशी जुनीच टेप त्यांनी लावली, पण भाजपबरोबर 2014, 2017 आणि 2019 या तीन वर्षांमध्ये नेमक्या काय वाटाघाटी झाल्या?, या संदर्भात अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर शरद पवारांनी भाष्य करणे टाळले.
किती आमदार तिकडे, किती आमदार इकडे, या मुद्द्यात मी पडत नाही. आमदार निवडून येतात आणि पडतात, असे सांगून विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी अजितदादांकडे सरेंडर करून टाकली.
अजितदादांच्या भाषणांमध्ये जेवढा जोर आणि जोश होता, तेवढा जोश शरद पवारांच्या भाषणात आज दिसला नाही. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपांना, तर शरद पवारांनी स्पर्श देखील केला नाही.
अजित पवारांनी शरद पवारांच्या संपूर्ण राजकीय आयुष्याचे अक्षरशः वाभाडे काढून लक्तरे वेशीवर टांगली. पण शरद पवारांनी अजित पवारांच्या एकही आरोपाला प्रत्युत्तर दिले नाही. भाजप जातीयवादी आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर जायला विरोध आहे. नागालँड आणि महाराष्ट्रातली परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. नागालँड चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेले छोटे राज्य आहे, असा चुकीचा उल्लेख शरद पवारांनी यावेळी केला. वास्तवात नागालँड हे चीन आणि बांगलादेश या दोन देशांमधल्या देशांच्या सीमेवर असलेले छोटे राज्य आहे, हे शरद पवारांसारखा चाणाक्ष राजकारणी विसरला.
भाजप नेतृत्वाबरोबर शरद पवारांनी कोणत्या वाटाघाटी केल्या?, कशा वाटाघाटी केल्या?, मंत्रिमंडळातले खातेवाटप, पालकमंत्र्यांचे वाटप याची सविस्तर चर्चा कशी झाली?, याचे वर्णन केले होते. परंतु त्या मुद्द्याला शरद पवारांनी आपल्या भाषणात पूर्णपणे बगल दिली.
त्या उलट राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला वाढवायची आहे. आमदार येतील आणि जातील. सर्वसामान्य माणसे आमदार होतील असे सांगताना त्यांनी 1980 चे उदाहरण पुन्हा एकदा दिले. 1980 मध्ये 68 आमदार निवडून आले. पण त्यातले 62 आमदार निघून गेले. चार वर्षानंतरच्या निवडणुकीत त्यातले फक्त चार आमदार निवडून आले आणि बाकीचे सगळे पडले, असे सांगून शरद पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. पण हा जोश भरताना पवारांनी अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या मूळ आरोपांवर विशेषतः आपल्या दुटप्पी राजकारणावर भाष्य करणे पूर्णपणे टाळले.
अजित पवारांचे आजचे भाषण गेल्या 40 वर्षात शरद पवारांवरांची सगळी भडास काढण्यातले सर्वोत्तम भाषण ठरले, पण शरद पवारांचे भाषण मात्र नियमित भाषणापेक्षाही सौम्य किंबहुना गुळमुळीत ठरले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App