प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भ दौरा अर्धवट सोडला असला तरी तो चांगलाच गाजतो आहे. पवारांनी या दौऱ्यात वेगवेगळी राजकीय विधाने केली आहेत त्यावरून महाराष्ट्रातल्या विविध पक्षांचे नेते एकमेकांवर वार आणि प्रहार करत आहेत.Pawar-Raut-Bonde quarrel; Rats and cats enter Maharashtra’s politics
शरद पवार यांनी भाजप सूडाचे राजकारण करतो आहे. त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल, असे विधान केले होते. त्यावर शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पवार खरेच बोलतात. त्या त्यांच्या मनातल्या वेदना आहेत. भाजप सुडाचे राजकारण करून खोट्या केसेस दाखल करत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देत आहे, असे वक्तव्य केले होते.
त्याला अमरावती दंगली प्रकरणात अटक केलेले भाजपचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार हे कधीच खोटे बोलत नाहीत, असे म्हणणे म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही, असे म्हणण्यासारखे आहे, असा टोला अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पवार – राऊत आणि बोंडे यांचे भांडण आहे झाले आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उंदीर – मांजर शिरले आहेत असे दिसून येते…!!
शरद पवार यांनी विदर्भात नागपूर आणि गडचिरोलीचा दौरा केला परंतु ते यवतमाळला गेले नाहीत. त्यावरूनही अनिल बोंडे यांनी पवार यांना टोला लगावला आहे. मी एक डॉक्टर म्हणून सांगतो शरद पवारांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. विदर्भ हा राष्ट्रवादीला मानवणारा नाही.
कारण विदर्भात प्रचंड असंतोष आहे. ठाकरे – पवार सरकारने शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचा असंतोष आहे. हा पवारांना आपल्या अर्ध्याच विदर्भ दौर्यात दिसला असेल त्यामुळे त्यांनी पुढचा दौरा रद्द केला असेल, असा टोला अनिल बोंडे यांनी पवारांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App