विशेष प्रतिनिधी
मुंबई : एरवी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) खासदार सुप्रिया सुळे या सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाबद्दल बोलताना आपल्या आई-वडिलांच्या संस्कारांच्या नेहमी बाता मारत असतात पण पवारांनी केलेले “राष्ट्रवादी संस्कार”बहुसंख्य वेळा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वेगळ्या कृतीतूनच उघड्यावर येतात. याची दोन उदाहरणे नुकतीच समोर आली. पवार संस्कारित राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याने आपल्या हॉटेलमध्ये कुंटणखाना चालवल्याचे समोर आले तर दुसऱ्या पदाधिकाऱ्याने आईला मारहाण केल्याचे उघड्यावर आले.
त्याचे झाले असे :
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी सुनील आहेर उर्फ गोटू आबा याने नाशिक जिल्ह्यातल्या देवळामध्ये स्वतःच्याच हॉटेल वेलकम मध्ये कुंटणखाना चालवून तिथे बांगलादेशी महिलांना आणल्याचे उघड्यावर आले. पोलिसांनी बांगलादेशी महिलांना आणि हॉटेल वेलकमच्या मॅनेजरला ताब्यात घेतले पण गोटू आबा मात्र पळून गेला. हा गोटू आबा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा देवळा शहरातला चेहरा होता. त्याने देवळात बरीच सामाजिक काम उभे केल्याचे सांगितले जात होते. पण त्याचे हे “सामाजिक काम” कुंटणखाना चालवण्याचे होते, हे मात्र पोलीस तपासात उघडे झाले.
दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लोणावळ्यात आपल्याच आईला बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचा अध्यक्ष आणि कारल्याच्या एकविरा देवस्थानचा ट्रस्टी मारुती देशमुख यांनी आपल्या आईला मारहाण करून जखमी केले. दोन भावांच्या भांडणांमधून हे घडले. आई धाकट्या भावाकडे राहत होती ती त्याच्याकडून आपल्या घरी राहायला आली. हे मारुती देशमुखला आवडले नाही म्हणून त्याने आईला मारहाण केल्याचा आरोप कसा धाकटा भाऊ राजेंद्र देशमुख यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सत्तेचा गैरफायदा घेत असल्याचे दुसरे उदाहरण समोर आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App