आपल्याच कुटुंबातील पदे वाचवा, इतरांची घालवा; पवार खानदानाची दीर्घसूत्री राजकीय मोहीम!!

Pawar family saving their own memberships of parliament and assembly, but trying to remove each other's factions memberships

नाशिक : आपल्याच कुटुंबातील पदे वाचवा; इतरांची घालवा, अशी दीर्घसूत्री राजकीय मोहीम पवार खानदानाने आखली आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी एकमेकांच्या आमदार – खासदारांविरुद्ध केलेल्या याचिकांमधून ही बाब समोर आली आहे. Pawar family saving their own memberships of parliament and assembly, but trying to remove each other’s factions memberships

लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांचे खासदारकी करण्याचा रद्द करण्याची याचिका शरद पवार गटाने लोकसभा अध्यक्षांकडे केलीच आहे, त्या पाठोपाठ
राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करा, या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार वंदना चव्हाण उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांना भेटल्यानंतर अजित पवार गटाने देखील अशीच खासदारकी रद्द करण्याची चाल खेळली आहे. शरद पवार गटाच्या खासदार वंदना चव्हाण आणि खासदार फौजिया खान यांची खासदारकी रद्द करण्याची याचिका अजित पवार गटाने दाखल केली आहे.

पण या याचिकेतून अजित पवार गटाने शरद पवार यांना वगळले आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केलेली नाही. त्याचबरोबर लोकसभेतले खासदार श्रीनिवास पाटील आणि लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचीही खासदारकी रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे, पण लोकसभा अध्यक्षांना केलेल्या याचिकेतून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे नाव वगळले आहे. शरद पवार गटाला सहानुभूती मिळू नये यासाठी ही चाल खेळण्याचे बोलले जात आहे.

याआधी शरद पवार गटाने देखील अजित पवारांबरोबर गेलेल्या 8 मंत्र्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे, पण त्यात अजित पवारांचे नाव नाही.

याचा राजकीय अर्थ असाच होतो की आपल्या कुटुंबातल्या सदस्यांची आमदार – खासदार पदे वाचवा आणि इतरांची घालवा!!

पवारांची दीर्घसूत्री चाल

अजित पवारांबरोबर बारामतीत थेट संघर्ष झाला तर आपला पराभव होईल या भीतीने सुप्रिया सुळे आपल्यासाठी नवा सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याची बातमी आहे. याची सुरुवात सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाने आधीच एक व्यक्ती राजकीय क्षेत्रात “पेरून” केली आहे. तृप्ती देसाई यांच्या रूपाने एक बफर उमेदवार तयार केला जात आहे. बारामतीतून इथून पुढे घराणेशाहीचा खासदार नको अशी भूमिका घेत तृप्ती देसाई यांनी मध्यंतरी मुलाखती दिल्या होत्या. यामागचे खरे इंगित सुप्रिया सुळे यांच्यासाठी एस्केप रूट तयार करणे म्हणजेच बारामतीतून राजकीय पलायनाचा मार्ग तयार करणे हेच होते.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या पुढच्या करिअरसाठी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी आणि बारामतीतून घराणेशाहीचा नको, तर अन्य खासदार निवडावा म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव परस्पर कटावे, पण राष्ट्रवादीचाच खासदार व्हावा, असा राजकीय डाव शरद पवार गटाकडून रंगविला जात होता.

पण आता खासदारकी रद्द करण्याच्या यादीतून याचिकांमधून सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे नाव वगळल्यानंतर अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघ आपल्या उमेदवारासाठी कुटुंबातूनच “सुरक्षित” करून घेतला आहे. त्यामुळेच अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या विरोधात असले तरी आपापल्या समर्थकांची खासदारकी गेली तरी चालेल, पण पवार कुटुंबातली खासदारकी आणि आमदारकी वाचली पाहिजे हीच त्यांची भूमिका असल्याचे दिसत आहे.

Pawar family saving their own memberships of parliament and assembly, but trying to remove each other’s factions memberships

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात