‘’… याचा त्यांना पोटशूळ आहे.’’, असंही प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मागील काही दिवासांपासून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. शिवाय, मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पवार कुटुंबावर टीका केली आहे. Pawar family is allergic to Devendra Fadnavis Praveen Darekars statement
दरेकर म्हणाले, ‘’पवार कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीस यांची अॅलर्जी आहे. त्यांच्याकडून सातत्याने द्वेष, तिरस्कार करत टोकाचे राजकारण करण्यात आले आहे. एक लोकनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे. याचा त्यांना पोटशूळ आहे, सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विषयी चांगले बोलणे अपेक्षितच नाही.’’
आमदार प्रकाश सोळुंके यांनी मराठा आंदोलनादरम्यान त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना केलेल्या विधानावरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर निशाणा साधला होता.
‘’राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार स्वतः सांगत आहेत त्यांच्या घरावर झालेला हल्ला पुर्वनियोजित होता.हल्लेखोरांकडे हत्यारे, पेट्रोलबॉम्ब, दगड आदी होते. या संपूर्ण घटनाक्रमात पोलीसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असेही त्यांचे म्हणणे आहे. ते गृहखाते आणि गृहमंत्री महोदयांचे अपयश अधोरेखित करीत आहेत.
जर या राज्यात सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आहे. राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरलेत आणि त्यांना गृहखाते झेपत नाही. याचा हा आणखी मोठा पुरावा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी मोकळे करावे.’’ असं सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App